News Flash

कुटुंब नियोजन करताना ताणतणावाला समोरं जाताय? मग वेळीच घ्या ‘ही’ काळजी

तणावापासून दूर राहण्यासाठी घ्या ही काळजी

डॉ. माधुरी बुरांडे लाहा

सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात ताण, तणाव, नैराश्य, उदासीनता अशा अनेक समस्यांनी नागरिक सामोरं जात असल्याचं पाहायला मिळतं. सतत धावतं जीवन आणि घराकडे आणि आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष याचा परिणाम ओघाओघाने कुटुंबव्यवस्थेवर किंवा कुटुंब नियोजन करताना होत असतो. यातून अनेक जण तणावाला बळी पडतात. बऱ्याच वेळा एकमेकांच्या समस्या न लक्षात आल्यामुळे नात्यात दुरावा होण्याची शक्यता असते.त्यामुळे कुटुंब नियोजनाचा विचार करताना ताणतणावाला दूर ठेवणे गरजेचे आहे. परंतु, प्रत्येक वेळी जबाबदारी आणि कर्तव्य यातून बाहेर पडायला मार्ग मिळत नाही. परिणामी, शारीरिक आणि मानसिक ताण येतो. अशा वेळी तणावग्रस्त न होता, या समस्येवर कसा मार्ग शोधता येईल ते पाहुयात.

१. नैराश्याला ठेवा दूर –
तणावाची महत्त्वाची पातळी म्हणजे नैराश्य. एकदा का नैराश्य आलं की मनावरील ताण वाढत जातो. त्यामुळे निराश होऊ नका. आजूबाजुला घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आपल्या आवडत्या गोष्टींची यादी करा. स्वत:साठी वेळ द्या. दिवभराचं नियोजन आखा आणि त्यानुसार काम करा. कामाचं योग्य नियोजन असेल तर ऐनवेळी धांदल आणि गोंधळ होणार नाही. प्रत्येत काम वेळापत्रकानुसार पार पडेल. परिणामी मनावर ताण किंवा नैराश्य येणार नाही.

२. नोंदवही तयार करा –
आपल्या रोजच्या कामाची एक नोंदवही तयार करा. त्यात तुमच्या दिनक्रमाविषयी, आवडीनिवडींविषयी, विचार मांडा. तसंच शक्य असेल तर रोजनिशी लिहा.

३. योग- ध्यानधारणा –
योग करणं आणि चिंतन,मनन करणे हे मन:शांती मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे नैराश्यावरही मात करता येऊ शकते.

४. आनंदी रहा-
लहान लहान गोष्टींमधून आनंद मिळविण्यास शिका. संगीत ऐका, स्वयंपाक करा, वाचन,लिखाण, बागकाम, विणकाम अशा विविध आवडीच्या कामांमध्ये मन रमवा.

५. व्यायाम करा –
व्यायाम केल्यामुळे शारीरिक मरगळ दूर होते. त्यामुळे व्यायाम करा. एरोबिस्क, स्ट्रेचिंग, चालणे असे व्यायाम प्रकार करा.

६.सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. कारण तणाव हे वंध्यत्वाचे एक कारण आहे.

७. आवश्यकतेनुसार समुपदेशनाची निवड करा. हे आपल्या सर्व शंका दूर करण्यात मदत करू शकते.

(लेखिका डॉ. माधुरी बुरांडे लाहा या मदरहुड हॉस्पिटल खराडी, पुणे येथे सल्लागार, प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2020 3:36 pm

Web Title: the effects of stress on family planning ssj 93
Next Stories
1 दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
2 चिकन बिर्याणी की, मसाला डोसा? लॉकडाउनमध्ये भारतीयांनी कुठल्या पदार्थाची सर्वात जास्त ऑर्डर दिली?
3 पावसाळ्यात जपा पायांचं सौंदर्य; घ्या ‘ही’ काळजी
Just Now!
X