24 November 2020

News Flash

मेंदूत कॅल्शियम वाढल्याने कंपवाताचा धोका

अल्फा सायन्युक्लीन कॅल्शियमचे संवेदक असते

| February 21, 2018 01:04 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अल्फा सायन्युक्लीन कॅल्शियमचे संवेदक असते

मेंदूतील पेशींमध्ये अतिरिक्त कॅल्शियम साठले, तर त्यामुळे पार्किन्सन म्हणजे कंपवाताचा धोका असतो, असे ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठातील संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मेंदूत जर कॅल्शियम साठत गेले, तर त्यातून चेतापेशींच्या टोकाला असलेल्या पातळ पटलांना धोका पोहोचतो व त्यामुळे मेंदूतील संदेशवहन यंत्रणा बिघडते. पार्किन्सनशी संबंधित अल्फा सायन्युक्लिन या प्रथिनावर त्यामुळे परिणाम होतो. कॅल्शियम व अल्फा सायन्युक्लिन यांचे प्रमाण वाढले तर शृंखला अभिक्रियेत मेंदूच्या पेशी मरण्यास सुरुवात होते. जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून पार्किन्सनवर त्यामुळे नवा प्रकाश पडला आहे. पार्किन्सनमध्ये मेंदूचा ऱ्हास होत असतो. नैसर्गिक प्रथिनांच्या घडय़ा वेगळ्या आकारात जाऊन विस्कटल्या जातात व ते एकमेकांना चिकटतात त्यामुळे पार्किन्सन होतो. यात वेटोळ्यासारखे अमायलॉडचे धागे तयार होतात. ते अल्फा सायन्युक्लिनवर थरासारखे बसतात. अल्फा सायन्युक्लिनचा मेंदूतील महत्त्वाचा भाग काय आहे. हे समजले नव्हते, प्रत्यक्षात त्याचा मेंदूतील अनेक  प्रक्रियांशी संबंध असून रसायनांची क्रिया त्याच्यावर अवलंबून असते. ते अतिशय लहान प्रथिन असले, तरी त्याची भूमिका महत्त्वाची असते. त्याचा अभ्यास करणे त्याच्या आकारामुळे अवघड असते, असे केंब्रिजच्या संशोधक गॅब्रियली कामिन्स्की यांनी म्हटले आहे.

अल्फा सायन्युक्लीन हे कॅल्शियमचे संवेदक असते, कॅल्शियममुळे या प्रथिनाची रचना बदलते, त्यामुळे पार्किन्सन होतो. कॅल्शियम व अल्फा सायन्युक्लिन यांचा समतोल असेल, तर पार्किन्सनला आळा बसतो. हृदयविकारात कॅल्शियमला रोखणारी औषधे वापरतात त्यांचा पार्किन्सनवर उपयोग होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 1:04 am

Web Title: the effects of too much calcium in the brain
Next Stories
1 पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ आसन करा
2 बाइक, गीता वर्माची आणि त्यांची!
3 शाओमी Mi Mix 2s चे फिचर्स iPhone X सारखे
Just Now!
X