सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या ऑफर्स घेऊन येतच असतात. सध्या नोव्हेंबर महिन्यात ‘द ग्रेट होंडा फेस्ट’ सुरू आहे. कंपनीनं आपल्या अमेझ, अमेझ स्पेशल एडिशन, WR-V, नवी Jazz, 5th जनरेशन सिटी आणि सिविक सेडान या गाड्यांवर मोठी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांवर तब्बल अडीच लाखांपर्यंत सूट देण्यात येत असून ३० नोव्हेंबरपर्यंत या ऑफरसचा फायदा घेता येणार आहे. दरम्यान, यामध्ये निरनिराळ्या ठिकाणांनुसार ऑफरमध्ये काही बदल दिसू शकतात.

हाँडा कार्सवर देण्यात येणाऱ्या ऑफर्समध्ये कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस, फ्री एक्सटेंडेड वॉरंटी सामील आहे. तर विद्यमान हाँडा ग्राहकांनाही कंपनीकडून अन्य सुविधा देण्यात येत आहे. यामध्ये ६ हजार रूपयांचे लॉयल्टी बेनिफिट आणि १० हजार रूपयांचे एक्सचेंज बेनिफिटही देण्यात येत आहे.

Amaze

होंडा अमेझवर ४७ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स देण्यात येत आहेत. होंडा अमेझ पेट्रोलच्या सर्व व्हेरिअंटवर १२ हजार रुपयांची एक्सटेंडेड वॉरंटी (चौथे आणि पाचवे वर्ष), २० हजार रुपयांपर्यंतचे कॅश डिस्काऊंट आणि जुन्या कार एक्सचेंजवर १५ हजार रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात येत आहे. होंडा अमेझच्या डिझेल व्हेरिअंटवरदेखील या ऑफर लागू असतील. परंतु यावर कॅश डिस्काऊंट केवळ १० हजार रुपयांपर्यंत आहे. होंडा अमेझची सध्याची एक्स-शोरूम दिल्लीतील किंमत ६.१७ लाख रुपयांपासून सुरू होते.

Amaze स्पेशल एडिशन

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं Amaze ची स्पेशल एडिशन लाँच केली आहे. याची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत ७ लाख रूपये आहे. यावर कंपनीकडून १५ हजारांपर्यंतच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. जर तुम्ही जुनी गाडी एक्सचेंज करून अमेझचे पेट्रोल आणि डिझेल एसएमटी आणि एससीव्हिटी या एडिशनपैकी कोणती कार घेणार असाल तर यावर ७ हजारांपर्यंत कॅश डिस्काऊंट देण्यात येईल. जर जुनी अमेझ देऊन स्पेशल एडिशन अमेझ घेतल्यास त्यावर १५ हजारांची अतिरिक्त सूट मिळेल.


5th जनरेशन City

या कारच्या सर्व व्हेरिअंटवर केवल एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. यावर कंपनीकडून ३० हजारांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. नव्या होंडा सिटीची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत १० लाख ८९ हजार ९०० रूपये आहे.

Jazz आणि WR-V

नव्या Jazz या कारची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत ७ लाख ४९ हजार ९०० रूपये आहे. यावर कंपनीकडून ४० हजारांपर्यंतच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. तर WR-V ची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत ८ लाख ४९ हजार ९०० रूपये असून यावर कंपनीकडून ४० हजारांपर्यंतचे फायदे देण्यात येत आहेत.

Civic

या कारची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत १७ लाख ९३ हजार ९०० रूपये आहे. या कारवर नोव्हेंबर महिन्यात अडीच लाखांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. सिविकच्या पेट्रोलच्या सर्व व्हेरिअंटवर १ लाखांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट तर डिझेलच्या सर्व व्हेरिअंटवर अडीच लाखांपर्यंतची सूट देण्यात येत आहे.