News Flash

फेसबुकवर आता दिसणार नाही लाइक्सची संख्या, नंबर गेम येणार संपुष्टात

फेसबुकवर एखादी पोस्ट केल्यानंतर त्याला किती लाइक्स मिळतात ही युजर्ससाठी मोठी गोष्ट असते.

लाईक्स

फेसबुकवर एखादी पोस्ट केल्यानंतर त्याला किती लाइक्स मिळतात ही युजर्ससाठी मोठी गोष्ट असते. किंबहूना बऱ्याचदा हा नंबर गेम त्यांच्यासाठी ईर्षेचा आणि जीवघेणाही ठरतो आहे. हे टाळण्यासाठीच लाइक्सची संख्या दाखवणे फेसबूक आता बंद करणार आहे.

फेसबुकने अधिकृतरित्या जगात काही भागात युजर्सच्या पोस्टवरील लाइक्सची संख्या दाखवणे बंदही केले आहे. २७ सप्टेंबरपासून सर्वात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यानुसार, पोस्ट करणाऱ्या युजर्सलाच केवळ त्याच्या पोस्टवर आलेल्या लाइक्सची आणि रिअॅक्शन्सची संख्या दिसू शकेल. मात्र, इतरांना ही संख्या दिसू शकणार नाही तर म्युच्युअल फ्रेन्डच्या नावासह रिअॅक्शन्सचे आयकॉन दिसतील. अशा प्रकारे इतर युजर्सना एकमेकांच्या पोस्टवर येणाऱ्या लाइक्सची संख्या दिसणार नाही. त्यामुळे लाइक्सच्या नंबर गेमचे युद्धही कमी होण्यास मदत होईल.

व्हिडिओचे व्ह्यूव्जही फेसबूक करणार बंद

लिखीत पोस्टबरोबरच व्हिडिओ पोस्टवर आलेले व्ह्यूव्जही बंद करण्याचा फेसबूकचा प्रस्ताव आहे. फेसबुकने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, “फेसबुकवर लाइक्स आणि स्पर्धात्मक लढाई आम्हाला पहायची नाही. आमचा हा निर्णय एक प्रयोग असून यातून हे स्पष्ट होईल की लोक या नव्या फॉरमॅटला कशा पद्धतीने स्विकारतात. यावरुन आम्हाला हे देखील कळेल की आम्ही संपूर्ण जगभरात हे लागू करु शकतो का?
फेसबूक पुढे म्हणते की, या लाईक गेममुळे आपल्या युजर्सवर होत असलेल्या दबावाची आपल्याला जाणीव आहे. फेसबुकवर कमी लाइक्स मिळत असल्याने तणाव, सायबर बुलींग आणि आत्महत्येच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या प्रयोगामुळे यापुढे लोक आपले विचार, फोटो आणि व्हिडिओ कोणत्याही काळजीशिवाय सहज पोस्ट करु शकतील.

इन्स्टाग्रामवर यापूर्वीच लाइक्स हाईड करण्यासाठी एक प्रोटोटाइप डिझाईन करण्यात आला आहे. हा प्रोटोटाइप युजर्सच्या पोस्टवरील लाइक्स लपवून टाकतो. मात्र, इन्स्टाग्रामने हे स्पष्ट केले आहे की, हा एक इंटर्नल टेस्टिंग प्रोटोटाईप असून तो सर्व युजर्ससाठी उपलब्ध नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 5:07 pm

Web Title: the number of likes no longer seen on facebook number game will stop now aau 85
Next Stories
1 विविध बँकामध्ये 12,075 लिपिकपदांची भरती
2 OnePlus चा 7T आणि टीव्ही भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
3 वनप्लस ७टी सिरीज आणि वनप्लस टीव्ही आज भारतात होणार लाँच, जाणून घ्या सर्वकाही
Just Now!
X