16 February 2019

News Flash

भारतीय स्वयंपाकगृहांना हवाहवासा असलेला आमूलाग्र बदल

भारतीय स्वयंपाकघरांमध्ये आमूलाग्र बदल घडवण्यात आघाडीवर आहे प्रेस्टिज

स्वयंपाकघर हा खरंतर घराचा आत्मा असतो. परंतु जर योग्य ती उपकरणं नसतील तर तर स्वयंपाकघर सक्षमपणे काम नाही करू शकत. आधुनिक जीवनशैलीमुळे जसा भारतीय स्वयंपाकघरांमध्ये आमूलाग्र बदल झालाय तसाच बदल उपकरणांमध्येही झालाय. सुलभीकरणाची वाढती गरज आणि वाढती सौंदर्यदृष्टी यामुळे चांगल्या उपकरणांची निर्मिती झाली असून यामुळे स्वयंपाक करणं हे केवळ सोपंच नाही झालं तर तो एक आनंदाचा अनुभव ठरायला लागलं आहे.

भारतीय स्वयंपाकघरांमध्ये आमूलाग्र बदल घडवण्यात आघाडीवर आहे प्रेस्टिज. टीटीके या अत्यंत नावाजलेल्या ब्रँडअंतर्गत असलेली प्रेस्टिज ही स्वयंपाकाची उपकरणं बनवणारी भारतातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे आणि देशभरातल्या घरांची गरज पूर्ण करत आहे. भारतीय घरांशी असलेलं हे नातं आणखी घट्ट करण्यासाठी तसेच स्वयंपाक करण्याची पद्धत सोपी व दर्जेदार करण्यासाठी कंपनीनं काही नवीन उत्पादनं बाजारात आणली आहेत. यामध्ये क्लिप ऑन प्रेशर कुकरची रेंज आहे, सुबक असा मिक्सर ग्राइंडर, इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल करणारे हॉबटॉप्स व बरंच काही आहे.

क्लिप ऑन प्रेशर कुकर आतल्या व बाहेरच्या झाकणामध्ये असलेली त्रासदायक दरी मिटवते. शिजवता येणं, शॅलो किंवा डीप फ्राय करता येणं इतकंच नाही तर या उपकरणांमधून तुम्ही खाणं सर्व्ह देखील करू शकता. ही उपकरणं आकर्षक आहेत, सुंदर व मजबूत काचेची झाकणं यात असून अत्यंत कठोर अशा युरोपियन प्रमाणांवर आधारित आहेत. ग्राहकांसाठी आकर्षक असे पर्यायही उपलब्ध आहेत. हे कुकर लोकप्रिय अशा सॉसपॅन, कढई, शॅलो पॅन, व हंडी या प्रकारात व तीन लिटर, साडेतीन लिटर व पाच लिटर क्षमतेत उपलब्ध आहेत. अत्यंत दणकट असं दोन रंगांचं स्टेनलेस स्टील सौंदर्यात भर घालतं आणि अन्न सर्व्ह करण्यासाठीही कुकर सुयोग्य बनवतं. कुकर्स इंडक्शन व गॅसला अनुरूप प्रकारात आहेत.

अत्यंत आकर्षक अशा मिक्सर व ग्राइंडरचे प्रकार स्वयंपाकघरात असावेतच इतके चांगले असून दळणं, मळणं, चिरणं आदी गोष्टी अत्यंत सोप्या व विनाकष्टाच्या करतात. उच्च दर्जाची पाती व दणकट मोटर या उपकरणांमध्ये वापरण्यात आली आहे. त्यामुळे काम अत्यंत सोपं व प्रवाही होतं. बहुआयामी व वापरण्यास सोपं असलेल्या या उपकरणामध्ये ७५० वॉटची मोटर असून अत्यंत कार्यक्षम अशी चार पाती बसवलेली आहेत. मोटरला पाच वर्षांची वॉरंटी आहे, जी मनाला शांतता देईल.

या सगळ्या ऑल इन वन पॅकेजिंगच्या माध्यमातून स्वयंपाकघराचा अनुभव चांगला करणं हा प्रेस्टिजचा उद्देश आहे. पाच दशकांपेक्षा जास्त परंपरा लाभलेली प्रेस्टिज याची काळजी घेते की प्रत्येक उत्पादन हे सुरक्षा, नावीन्य, टिकाऊपणा व विश्वास या चौघांच्या आधारावर उभारलेलं असेल, ज्यामुळे लाखो घरांमध्ये प्रेस्टिज हा पहिली पसंती असलेला ब्रँड आहे.
उत्पादनांविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही प्रेस्टिजच्या स्मार्ट किचन आउटलेटला भेट देऊ शकता, तिथली सेल्स टीम तुमच्या वैयक्तिक गरजा जाणून घेऊन तुम्हाला सुयोग्य अशी उत्पादनं सुचवतील. किंवा पुढील लिंकवर क्लिक करून आमच्या वेबसाईटला भेट द्या.
[https://www.prestigesmartkitchen.com/]

(प्रायोजित)

First Published on September 14, 2018 3:08 pm

Web Title: the transformation that indian kitchens deserve