News Flash

video : रंग बदलणाऱ्या कृत्रिम नखांचा फॅशन विश्वात ट्रेंड

फॅशनविश्वात गेल्या काही दिवसांपासून एक ट्रेंड धुमाकूळ घालतोय. हा ट्रेंड म्हणजे आपोआप रंग बदलणाऱ्या नखांचा.

या ट्रेंडची चर्चा फॅशन विश्वात होताना दिसत आहे.

फॅशन विश्वात कोणतीही गोष्ट स्थिर नसते येथे दर आठवड्याला वेगवेगळे ट्रेंड येत असतात. हे ट्रेंड फॉलो करणाऱ्यांची संख्या खूपच मोठी आहे. तर फॅशनविश्वात गेल्या काही दिवसांपासून एक ट्रेंड धुमाकूळ घालतोय. हा ट्रेंड म्हणजे आपोआप रंग बदलणाऱ्या नखांचा. कृत्रिम नखांना महिलांमध्ये मोठी पसंती आहे. ही नखं नैसर्गिक नखांपेक्षा अधिक आकर्षक आणि मोठी दिसतात त्यामुळे मॉडेल्सची या कृत्रिम नखांना पसंती असते. या नखांना वेगवेगळ्या रंगाच्या नेलपेंट्सनंही रंगवता येतं त्यामुळे या नखांना मागणीही जास्त आहे. मात्र आता यात वेगळाच ट्रेंड आला असून अनेक महिलांना तो आकर्षित करत आहे.

 

‘ड्युपी नेल्स’नं एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या कंपनीनं कृत्रिम नखं तयार केली आहेत. ही नखं रंग बदलतात. या नखांवर थर्मल चेंजिग पॉलिश लावण्यात आलं आहे. तापमान थोडं वाढलं किंवा कोमट पाण्यात ही नखं भिजली तर त्यांचा रंग लगेच बदलतो. या नेलपॉलिशमध्ये असणारी रंगद्रव्य तापमान वाढलं की फिकट रंगाची होतात अशी माहिती या ब्रँडनं दिली आहे. त्यामुळे या ट्रेंडची चर्चा फॅशन विश्वात होताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 4:24 pm

Web Title: these colour changing fake nails are exactly what you need
Next Stories
1 एचआयव्हीच्या उपचारांसाठी नवी लस
2 डेंग्यू होऊ नये म्हणून ही काळजी घ्या
3 ‘या’ गोष्टी केल्यास मेंदूचा थकवा होईल दूर
Just Now!
X