तुम्ही वारंवार उन्हामध्ये फिरत असाल तर त्याचे तुमच्या चेहऱ्यावर वाईट परिणाम दिसून येतात. चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, टॅनिंग होणे यांसारख्या गोष्टींमुळे तुम्ही तितके वय नसतानाही वयस्कर दिसायला लागता. इतकेच नाही तर तुमचे आरोग्य आणि तुमचे दिसणे हे तुम्ही घेत असलेल्या आहारावरही अवलंबून असते. आता आहारातील असे कोणते घटक आहेत ज्यामुळे तुमचे वय आहे त्याहून जास्त दिसते, तसेच हे पदार्थ तुम्ही किती प्रमाणात खाता आणि त्यांचे प्रमाण कमी केल्यास कसा फायदा होईल याविषयी…

१. गोड पदार्थ आणि साखर

health benefits of lauki
तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
What Happens To Body By Drinking One Glass Milk Everyday
एक ग्लास दूध रोज प्यायल्याने तुमच्या शरीराला फायदा होतोय की त्रास, कसे ओळखाल? शरीराचं कसं ऐकाल?
rangpanchami celebration
Health Special: रंगपंचमीला कोणते रंग वापराल? रंगांचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

आपण खात असलेल्या गोड पदार्थांचा आपल्या शरीरातील पेशींवर परिणाम होतो. जास्त गोड खाल्ल्यास त्याचा शरीरातील प्रथिनांबरोबर संयोग होतो. त्वचेतील कोलेजनवरही याचा परिणाम होतो. प्रथिने शरीरासाठी अतिशय उपयुक्त असून त्यांच्यामुळे आपली त्वचा तरुण दिसते आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मात्र जास्त गोड खाणे शरीराला हानी पोहचवते आणि नकळत आपण वयस्कर दिसायला लागतो. याशिवाय जास्त प्रमाणत गोड खाण्याने दातही खराब होतात.

२. मद्यपान

तुमच्या यकृतामध्ये टॉक्सिन्सचे प्रमाण जास्त असेल तर त्याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. दारु पिण्यामुळे हे टॉक्सिन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुम्हाला नियमित मद्यपान करण्याची सवय असेल तर तुम्ही लवकर वयस्कर दिसता तसेच आरोग्यासाठीही ते हानिकारक असते. जेव्हा तुमचे यकृत टॉक्सिन्सने भरते तेव्हा ती कमी करणे अवघड होते. मग त्याचे प्रमाण वाढल्याने ही टॉक्सिन्स रक्तात पसरतात. यामुळे रक्त नकळत खराब होते आणि त्याचा त्वचेवर परिणाम होऊन आपण वयस्कर दिसायला लागतो.

३. मीठ

तुम्हाला कोणत्याही पदार्थांवर जास्तीचे मीठ घालून खाण्याची सवय असेल तर तुमची त्वचा लवकर खराब होण्याची शक्यता असते. शरीरात जास्त प्रमाणात सोडियम गेल्यास पाणी शोषले जाऊन पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे तुमची त्वचा फुगलेली दिसते आणि तुम्ही वयस्कर दिसायला लागता.