डॉ. आरती सोमण

लहान मुलांच्या खाण्यापिण्याबाबत किंवा आहाराबाबत प्रत्येक पालकांची कोणती ना कोणती तक्रार ही कायमच असते. यात मुलं नीट जेवत नाही ही तक्रार हमखास ठरलेली आहे. अनेक मुलं जेवणासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे सहाजिकच त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. वजन कमी होणं, अशक्तपणा येणं हे त्रास मुलांमध्ये दिसतात. मात्र, मुलांच्या या समस्येचं नेमकं कारण काय हे जाणून घेऊयात.

मुलांना भूक न लागण्याची कारणे –

१. कौटुंबिक समस्या किंवा अभ्यासाचा ताण

२. लहान मुलांनादेखील नैराश्य येतं आणि त्यामुळे त्यांची भूक मंदावते.

३. अॅनोरेक्सिया नर्व्होसा म्हणजेच मनापासून जेवण न करावेसे वाटणे.

४. अॅनिमिया असलेली मुले आळशी, थकलेली आणि चिडचिडी असतात. त्यामुळे जेवताना ते कंटाळा करतात.

५. पोटात कृमी किंवा जंत झाल्यास मुलांची भूक कमी होणे, आतड्यांमध्ये रक्तस्त्राव, अतिसार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

६. कोठा नियमितपणे साफ न झाल्यास मुलांच्या भुकेवर परिणाम होऊ शकतो.

( लेखिका डॉ. आरती सोमण या निसर्ग हर्ब्स येथे आयुर्वेदिक विशेषज्ज्ञ आहेत.)