News Flash

उन्हाळ्याचा त्रास होतोय? मग दिनचर्येसोबतच पाण्याच्या भांड्यांकडेही नीट लक्ष द्या!

शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पारंपरिक उपाय हमखास कामी येतात.

उन्हाळ्यात नळाचं किंवा कळशीतलं उबळ पाणी पिलं जातं नाही….. आणि आरोग्याच्या दृष्टीने फ्रिजमधलं पाणीही प्यायचं नाहीये तुम्हीही अशा दुविधेत असाल तर ही माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडेल. जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे अशा कडाक्याच्या उन्हाळ्यात हेच जुने, पारंपरिक उपाय कामी येतात.

तुमच्या शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या थंड ठेवायचं असेल तर योग्य प्रकारची भांडी वापरणं फार महत्त्वाचं आहे. तांब्याची, लोखंडाची आणि मातीची भांडी यावेळी कामी येतात.
मातीच्या भांड्यात साठवलेलं पाणी पिल्याने आपल्या शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या नियंत्रित राहण्यात आणि शरीर थंड करण्यास मदत होते. कारण हे पाणी अल्कलाईन प्रकारचं असतं असं तज्ज्ञांचं मत आहे. माठातलं हे पाणी फ्रिजमध्ये कृत्रिमरित्या थंड होणाऱ्या पाण्याहून अधिक चांगलं आणि फायदेशीर असतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तांब्यांच्या भांड्यांमधून साठवलेलं पाणीही शरीरासाठी उत्तम असतं. हे पाणी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं. त्याचबरोबर या पाण्यामुळे पचनसंस्था सुधारते, जखमा लवकर बऱ्या होण्यास मदत होते. तसंच सांधे मजबूत होतात, रक्ताभिसरणाची प्रक्रियाही सुधारते.

तर आपल्या पूर्वजांकडून जुन्या जाणत्या माणसांकडून तुम्ही ऐकलं असेल की जेवण नेहमी लोखंडी भांड्यात किंवा मातीच्या भांड्यामध्ये करावा. यामुळे त्या पदार्थांमधले नैसर्गिक पोषक घटक टिकून राहायला मदत होते त्याचप्रमाणे या पदार्थांमधली उर्जा समप्रमाणात विभागण्यासही मदत होते. यामुळे हाडं आणि स्नायू मजबूत होतात आणि आजारही दूर राहतात.

तेव्हा या उन्हाळ्यात पारंपरिक उपायांच्या मदतीने ‘हाय गर्मी’ऐवजी म्हणा ‘बाय गर्मी’!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 1:17 pm

Web Title: these traditional solutions will help you to beat the heat vsk 98
Next Stories
1 आरोग्यवर्धक उन्हाळी पेयं
2 समजून घ्या : लहान मुलांना होणारा थॅलसेमिया हा आजार नक्की आहे तरी काय? त्याची लक्षणं आणि उपचार
3 ट्विटरबंदीची प्रक्रिया
Just Now!
X