News Flash

झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार नक्की करावा

जास्त झोपेपेक्षा शांत झोप गरजेची असते

किमान ८ तास झोप ही प्रत्येकाला आवश्यक आहे

झोप ही खूप महत्त्वाची असते, पण या धकाधकीच्या जीवनात पूरेशी झोप घ्यायला वेळ कोणाला असतो. काम, प्रवास, तणाव यासारख्या गोष्टींचा झोपेवर परिणाम होतो आणि जस जसा व्याप वाढतो तशी झोपही नाहीशी होते. किमान ८ तास झोप ही प्रत्येकाला आवश्यक आहे, कारण जर शांत आणि नीट झोप लागली नाही तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर आणि परिणामी जीवनशैलीवरही होतो. तेव्हा झोपेचे महत्त्व किती आहे हे तुम्ही समजू शकता. पण अनेकदा आठ तास झोप घेता येत नाही. झोपतानाही अनेकांच्या मनात सतत काहींना काही विचार सुरू असतात. या अती विचारांमुळे झोपेवरही त्याचा परिणाम होऊ लागतो. त्यामुळे झोपण्यापुर्वी काही चांगल्या गोष्टींचा विचार नक्की करा यामुळे कदाचित तुम्हाला चांगली झोप लागू शकते.

झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार कराल
* दिवसभरात तुमच्या सोबत चांगल्या आणि वाईट गोष्टी घडत असतात पण झोपण्यापूर्वी वाईट गोष्टींचा सतत विचार करून नकारात्मक उर्जा स्वत:मध्ये भरण्यापेक्षा ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या त्याचा विचार करा. असे केल्याने नेहमी सकारात्मक विचार करण्याची चांगली सवय तुम्हाला लागेल. ज्या नकारात्मक गोष्टींमुळे तुमच्या झोपेवर परिणाम होत आहे त्या नकारात्म गोष्टी बाजूला सरतील त्यामुळे झोपताना चांगल्या गोष्टींचा विचार नक्की करा.
* त्याचबरोबर झोपताना नेहमी उद्या काय कराल याचा विचार नक्की करा. नेहमी झोपताना आपल्या ध्येय धोरणाचा विचार करा.
* आजच्या पेक्षा उद्याचा दिवस कसा चांगला जाईल या गोष्टीचा विचार करा.
* नेहमी आपण आपल्यावर टीका करणा-या माणसांचा विचार करतो पण अशा व्यक्तींचा विचार करण्यापेक्षा आपल्यावर जे प्रेम करतात त्यांना आठवून झोपावे. चांगली झोप लागते.
* उद्याच्या दिवसाची सुरूवात मी सकारात्मक विचाराने करणार हा सकारात्मक विचार मनात ठेवून झोपावे.
* झोपताना शक्य तो चांगला सुविचार, चांगले पुस्तक वाचून झोपी जावे सकारात्मक प्रेरणा मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2016 11:49 am

Web Title: things you should think before go to bed
Next Stories
1 संगीतोपचारांनी मुलांच्या नैराश्येत घट
2 शिशूवरील अल्कोहोल परिणामांची चाचणी शक्य
3 फॅशनबाजार : डेनिमची मोहिनी
Just Now!
X