पेगासस स्पायवेअर, मोबाईल हॅकिंग या गोष्टी गेले काही दिवस चर्चेत आहेत. यामुळे साहजिकच पुन्हा एकदा मोबाइल हेरगिरीची भीती सर्वांसमोर आहे. आपला फोन तर हॅक झाला नाही ना अशी शंका सतत आपल्याला सतावत असेलं. म्हणूनच आता आपल्या फोनवर स्पायवेअर आहे की नाही हे ओळखण्याची वेळ आली आहे.पेगाससने आपली हेरगिरी करणे संभव नसले तरी, इतर हॅकिंग आणि हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर आणि अॅप्स अजूनही आहेत आणि हे अॅप्स आर्थिक आणि वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करू शकतात, असे गॅझेट्स नॉउ यांनी अहवालात दिले आहे.

फोनची बॅटरी वेगाने उतरणे

आपल्या फोनची बॅटरी विलक्षण वेगाने कमी होत असल्यास हे मालवेयर आणि फसव्या अ‍ॅप्समुळे असू शकते. अशावेळी बॅंकराउंडवर चालू असलेल्या अ‍ॅप्सची संख्या तपासा, आपणास आवश्यक नसलेले अ‍ॅप्सच बंद करा. हे केल्यावरही फोनकडे लक्ष द्या.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

न डाऊनलोड केलेले असे अॅप्स

आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण स्वतःहून न डाऊनलोड केलेले अॅप्स दिसले तर समजून जा की तुमचा फोन हॅक झालेला असू शकतो.

फोन खूप हळू चालणे

जर आपला फोन अचानकपणे खूप हळू चालत असेल तर कदाचित तुमचा फोन हॅक झालेला असू शकतो. बॅंकराउंडवरवर स्टील्थ मालवेयर चालू असू शकतात.

मोबाइल डेटा वापरात वाढ

आपला डेटा वापर नेहमीपेक्षा अचानक जास्त असल्याचे आढळल्यास,  कदाचित आपला मोबाईल डेटा हॅकर्स त्यांच्या अॅक्टिविटीजसाठी वापरत असावे.

फोन विचित्रपणे वागणे

आपला स्मार्टफोन विचित्र पद्धतीने काम करीत आहे अस लक्षात आलं तर हॅकर्स त्यांचे अ‍ॅप्स अनपेक्षितरित्या लोड करण्यात किंवा क्रॅश करण्यात अयशस्वी झाले असे असू शकते.

विचित्र पॉप-अप दिसणे

हॅकर्सचा सॉफ्टवेअर डिव्हाइसमध्ये बर्‍याच पॉप-अप जाहिराती असतात. त्या जाहिराती आपल्याला आल्या आणि आपण त्यावर क्लिक केलं तर आपला फोन हॅक होऊ शकतो. त्या पॉप-अपवर क्लिक करणे नेहमी टाळा.

गॅलरीमध्ये न ओळखीचे फोटो आणि व्हिडिओ

आपण आपल्या फोटो गॅलरीमध्ये आपण ओळखत नसलेले, न काढलेले, न डाऊनलोड केलेले फोटो आणि व्हिडिओ पाहिले तर सावधगिरी बाळगा, कारण कदाचित कोणीतरी आपले डिव्हाइस वापरू लागलं असेल.

फोन वापरत नसताना फ्लॅश लाईट चालू राहणे

आपण आपला फोन वापरत नसतानाही फ्लॅश लाईट चालू असल्याचे आपल्याला आढळल्यास कदाचित आपला फोन दुसरं कोणीतरी नियंत्रित करत आहे.

फोन गरम होणे

आपण आपला फोन जास्त वापरत नसतानाही तो खूप गरम होत असल्यास, हॅकर्सने फोन हॅक झाला असल्याची शक्यता आहे. अपरिचित मजकूर किंवा कॉल लॉगआपल्या फोनमध्ये न पाठलेले मेसेज किंवा कधीही न केलेले कॉल दिसत असतील तर लवकर सावध व्हा.