16 November 2019

News Flash

Thomsonचा भारतातील पहिला 4K अँड्रॉइड TV, किंमत 29 हजार 999 रुपये

43, 49, 55 आणि 65 इंच प्रकारांमध्ये हे टीव्ही उपलब्ध, उद्यापासून सेल सुरू

फ्रांसच्या Thomson कंपनीने भारतात नवीन 4K स्मार्ट टेलिव्हिजन मालिका लाँच केली आहे. गुगलच्या अँड्रॉइड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर हे थॉम्सनचे नवे 4K स्मार्ट टेलिव्हिजन कार्यरत असतील. 43, 49, 55 आणि 65 इंच प्रकारांमध्ये हे टीव्ही उपलब्ध आहेत. 14 जून रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर यासाठी सेल आयोजित करण्यात आला आहे.

4K ऐंड्रॉयड TV के फीचर

थॉम्सनच्या या चारही टीव्हींमध्ये प्रोसेसर, रॅम आणि ऑपरेटिंग सिस्टिमसह इतर स्पेसिफिकेशन जवळपास सारखेच आहेत. स्क्रीन साइज आणि आवाजाची गुणवत्ता यामध्येच अधिक फरक आहे.  65 इंचाच्या टीव्हीमध्ये 4 स्पीकर आहेत, तर उर्वरित 3 टीव्हींमध्ये 3 स्पीकर आहेत.  टेलिविजन डॉल्बी डिजिटल आणि DTS सपोर्ट यामध्ये असून अँड्रॉइड TV व्हर्जन 8.1 ओरियो ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असतील.

किंमत – 

43 इंचाच्या TVची किंमत 29 हजार 999 रुपये आहे

49 इंचाच्या TVची किंमत 34 हजार 999 रुपये आहे

55 इंचाच्या TVची किंमत 38 हजार 999 रुपये आहे

65 इंचाच्या TVची किंमत 59 हजार 999 रुपये आहे

 

First Published on June 13, 2019 10:12 am

Web Title: thomson launches first 4k android tv starting at rs 29 999 sas 89