पोषक आहाराच्या कमतरेतेमुळे आणि वाढतं प्रदूषण-रासायनिक ट्रीटमेंटमुळे केस निस्तेज होऊ शकतात. हे टाळण्यासाठी पोषक आहार आणि केसांच्या पोषणाकडे नीट लक्ष देणं अत्यावश्यक आहे. प्रोटिन्स, आयर्न नी व्हिटॅमिन्सच्या साहाय्यानं केस हेल्दी आणि सुंदर राखता येतील. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये घरी केसांसाठी उपयोगी ठरतील अशा सोप्या टिप्स देत आहोत. याचा वापर करण्याच्या अगोदर केसांना तेल लावायचे विसरू नका. यामुळे तुमचे केस मुलायम होण्यास मदत होईल.

तीन चमचे खोबऱ्याचे तेल २० मिनिटे गरम करून घ्या. थोडे कोमट झाल्यानंतर हळूवार केसाला लावा. कमीतकमी दहा मिनिटे डोक्याला तसेच राहू द्या. ते नीट मुरू द्या. त्यानंतर गरम पाण्यामध्ये टॉवेल किंवा एखादा कपडा भिजवून टॉवेल १० मिनिट तसाच केसांना घट्ट बांधून ठेवा. हे झाल्यावर केसांवरचा टॉवेल काढून केस शॅम्पूने धुवून टाका. खोबऱ्याच्या तेल लावून केस धुतल्यावर तुमचे राठ झालेले केसही मऊसूत होण्यास मदत होते

थोडी केळी घ्या त्यामध्ये दोन ते तीन चमचे ऑलिव्हचे तेल टाका आणि त्यांचं चांगलं मिश्रण करा. हे मिश्रण २० मिनिटापर्यंत केसांवर लावून ठेवा. २० मिनिटानंतर थंड पाण्याने केस धुवून घ्या आणि त्यावर कंडिशनर लावा. या मिश्रणाच्या वापराने केस चमकदार दिसण्याबरोबरच गळती कमी होण्यास मदत होईल. शिवाय केसाला मजबूती देण्यास मदत होईळ

एक कप दूध आणि एक चमचा मधाचे योग्य मिश्रण करा. तयार झालेले मिश्रण मुळापासून तुमच्या केसांना लावा आणि केसांना २० मिनिटे मसाज करा. हा लेप १५ मिनिटांपर्यंत तसाच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या. यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळण्यास मदत होईल.