लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ मेंकिग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म TikTok  एक नवीन फीचर आणायच्या तयारीत आहे. या फीचरद्वारे पालकांना आपल्या मुलाचं अकाउंट कंट्रोल करता येणार आहे. Family Safety Mode नावाचं हे फीचर आल्यानंतर मुलांना कोणत्याप्रकारचे व्हिडिओ दिसावेत हे पालकांना कंट्रोल करता येईल. या मोडद्वारे पालकांचे अकाउंट मुलांच्या अकाउंटशी लिंक केले जाते.

आणखी वाचा – (Kia ची जबरदस्त ‘क्रेझ’, Seltos ठरली एक नंबर SUV)

आणखी वाचा -(देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)

“नव्या फीचरवर कंपनीकडून काम सुरू आहे, TikTok च्या सर्वात लोकप्रिय युजर्ससोबत या फीचरची चाचणी सुरू आहे. युजर्सना आमचे प्लॅटफॉर्म वापरताना सुरक्षित वाटावे यासाठी नवनवे फीचर्स आणले जात आहेत. आता Family Safety Mode फीचरमुळे पालकांना आपल्या मुलाचे TikTok अकाउंट कंट्रोल करता येईल आणि त्यांच्यावर लक्षही ठेवता येईल. तसेच, युजर्स TikTok वर किती वेळ घालवतायेत याची माहिती आम्हाला त्यांना द्यायची आहे आणि बाहेरच्या जगातही वेळ घालवावा यासाठी त्यांना प्रेरित करायचंय”, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

आणखी वाचा – (प्रियंका गांधींची ‘लव्ह स्टोरी’ : 13 व्या वर्षी पहिली भेट, 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न)

आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)

भारतात TikTok ची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये TikTok वर भारतीय युजर्सनी सहापट अधिक वेळ घालवल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2019 मध्ये भारतीयांनी तब्बल 5.5 अब्ज तास TikTok चा वापर केला. यावरुनच TikTok ची लोकप्रियता स्पष्ट होते.

आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)