16 October 2019

News Flash

मोबाइल सतत हँग होतोय ? मग या टिप्स नक्की वाचा

स्मार्टफोनचा सातत्याने वापर करणाऱ्यांना अनेकदा फोन हँग होण्याची समस्या जास्त सतावते

मोबाइल सतत हँग होतोय ? मग या टिप्स नक्की वाचा

सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. ५.५  इंचाच्या या स्मार्टफोनमध्ये आपल्या कित्येक गोष्टी सामावलेल्या असतात. या  स्मार्टफोनमुळे आपल्या कित्येक गोष्टी सुकर होतात. मात्र स्मार्टफोनचा सातत्याने वापर करणाऱ्यांना अनेकदा फोन हँग होण्याची समस्या जास्त सतावते. बहुतांश कंपन्यांच्या स्मार्टफोन्सबाबतीत ही समस्या येते.  पण ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवते? आणि हे थांबवण्यासाठी नेमके काय करावे? यासाठी या टिप्स नक्की उपयोगी पडतील.

– आपला स्मार्टफोन हा अॅप्स, अनावश्यक फाईल्स, फोटो यांसारख्या डेटाने भरलेला असतो. बऱ्याच वेळा फोनमधील डेटा जास्त झाला की तो हँग व्हायला सुरूवात होते आणि आपण गोंधळून जातो. अशा वेळी आपल्या फोन स्टोरेजमधील डेटा हा मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर करून घ्यावा. यामुळे फोन हँग होण्यापासून थांबेल.

– फोनमधील अनावश्यक असणारे अॅप्स तात्पुरता अनइन्स्टॉल करावेत. गरज लागेल तेव्हा ते पुन्हा इन्स्टॉल केले जावू शकतात.

– तसेच फोनमधील फोटो सेव्ह करताना ते ‘गुगल ड्रायव्ह’ किंवा ‘क्लाऊड’मध्ये सेव्ह करावेत. यामुळे फोन मेमरी फोटोंमुळे भरणार नाही.

– या व्यतिरिक्त फोटो रि-साइज ऑप्शनव्दारे कमी साइझमध्ये सेव्ह करावेत.

– प्रत्येक वेळी आपण डाऊनलोड करत असलेला डेटा आपल्याला नेहमी उपयोगी असेलच असे नाही किंवा त्याचा पुन्हा वापर होईलच असेही नाही. अशावेळी काम झाल्यानंतर डाऊनलोड केलेला डेटा डीलीट करुन टाकावा.

First Published on April 3, 2019 7:28 pm

Web Title: tips for phone hanging problem