News Flash

टी बॅगचे हे पाच फायदे तुम्हाला माहितीयेत का?

शूजमधला दुर्गंध दूर करण्यापासून ते फूट स्पापर्यंत

टी बॅग फेकून देताना विचार करा

टी बॅगचा वापर करून झाल्यानंतर तुम्ही त्याचे काय करता? फेकून देता? पण यापुढे मात्र टी बॅग फेकून देताना विचार करा. फक्त चहा बनवण्यासाठीच नाही तर अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी या टी बॅगचा उपयोग होऊ शकतो.
शूजमधली दुर्गंधी घालवणे : अनेकदा शूजमधून येणा-या दुर्गंधीने अनेक जण त्रस्त असतात, थंडीत आणि उन्हाळ्यात याचे प्रमाण जरा जास्तच असते अशावेळी आपण डिओड्रंट शूजमध्ये मारतो आणि तात्पुरती वेळ निभावून नेतो, पण अशा वेळी टी बॅगचा वापर तुम्ही करू शकता. वापरलेली टी बॅग धुवून सुकवून घ्या आणि ही टी बॅग शूजमध्ये रात्रभर ठेवा. टी बॅग दुर्गंधी आणि शूजमधला ओलावा शोषून घेते.

जिम बॅगमधली दुर्गंधी घालवणे : जिम बॅगमधली दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही टी बॅगचा वापर करू शकता. बॅगच्या एका कोप-यात टी बॅग ठेवली तर लवकरच बॅगमधून येणारीही दुर्गंधी कमी होईल.
गार्डनसाठी : तुमच्या बाल्कनीत असलेल्या झाडांची काळजी घेण्यासाठी तुम्ही वापरलेल्या टी बॅगचा वापर करू शकता. टी बॅग पुन्हा पाण्यात बुडवून ते पाणी तुम्ही झाडांना घालू शकता. या टी बॅगपासून तुम्ही कंम्पोस्ट खत बनवू शकता.
फ्रिजमधली दुर्गंधी घालवण्यासाठी : फ्रिजमध्ये आपण अनेक पदार्थ ठेवतो, भाज्या, फळं, ज्यूस, मांस आणि इतर अन्नही या सगळ्याचा वास फ्रिज उघडल्या उघडल्या येतो किंवा अनेकदा कुबट वासही येतो अशावेळी वापरलेल्या टी बॅग फ्रिजच्या कोप-यात ठेवल्यावर दुर्गंधी दूर होते.
फूट स्पा : वापरलेल्या टी बॅग पुन्हा गरम पाण्यात बुडवून त्या पाण्यात काही काळ पाय बुडवून तुम्ही घरच्या घरी फूट स्पा घेऊ शकता. पायाची येणारी दुर्गंधी कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2017 9:28 am

Web Title: tips in marathi amazing use of tea bags
Next Stories
1 कच्चा लसूण व कांदा झोपेसाठी उपयोगी
2 मोटो जी ५ प्लस लाँच, आज मध्यरात्रीपासून होणार विक्री
3 टाकाऊपासून टिकाऊ आणि तितकेच सुंदरही
Just Now!
X