18 January 2019

News Flash

आनंदी राहण्यासाठी करा ‘हे’ उपाय

थोडे बदल ठरतील उपयोगी

आपल्यातील अनेक जण विविध कारणांनी कधी ना कधी उदास असतात. कधी एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली नाही म्हणून तर कधी एखाद्या गोष्टीत अपयश आलं म्हणून आपण निराश होतो. आनंदी राहा सांगणं सोपं असते पण प्रत्यक्ष परिस्थिती आल्यावर काय ते समजते असेही आपण अनेकदा म्हणतो. पण आपण आनंदी असू तर नकळत आपल्या आजूबाजूचे वातावरण चांगले राहते आणि आपली इतर कामेही सहज होतात. आपल्या मेंदूत serotonin नावाचे एक रसायन असते ज्यामुळे आपला मूड चांगला होण्यास मदत होते. त्यामुळे या रसायनाचे प्रमाण योग्य ते ठेवण्यासाठी खालील गोष्टी नक्की करा आणि बघा तुमचा मूड चांगला राहण्यासाठी मदत होते की नाही.

झोप

आरोग्य चांगले राहण्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. झोपेचा आणि serotonin चा थेट संबंध असतो. पुरेशी झोप मिळाली तर हे रसायन पुरेशा प्रमाणात तयार होते आणि मूड चांगला राहण्यास मदत होते. त्यामुळे मूड चांगला ठेवण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप घ्या.

व्यायाम

व्यायामामुळे शरीरातील अनेक हार्मोन्स चांगल्या पद्धतीने काम करतात. serotonin हे रसायन स्त्रवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक असते. म्ह्णून नियमित व्यायाम केल्यास आपला मूड चांगला राहून आपण आनंदी राहतो.

मसाज

शरीराला मसाज केल्यास शरीरातील सर्व स्नायू मोकळे होतात आणि आपल्याला रिलॅक्स वाटते. मसाज घेतल्याने serotonin च्या वाढीस चालना मिळते. त्यामुळे दुःख दूर होऊन प्रसन्न वाटते.

दूध आणि हळद

दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे दुधात असलेल्या α-lactalbumin मुळे serotonin ची निर्मिती होते. α-lactalbumin युक्त कोणत्याही आहाराने तुमचा मूड सुधारण्यास मदत होते. याबरोबरच हळद घालून हे दूध घेतल्याने चटकन मूड सुधारतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

First Published on January 10, 2018 4:04 pm

Web Title: tips to be happy always ways to increase happy hormone