News Flash

क्रेडिट कार्ड कर्जात अडकला आहात?

क्रेडिट कर्जापासून मुक्तता मिळवण्यासाठी काही टिप्स

सावधान!

क्रेडिट कार्ड हा प्रकार फार सुखावह वाटतो. खरेदी करायची, हाॅटेलमध्ये जायचं फक्त कार्ड स्वाईप करायचं आणि काम झालं. आपल्या महिन्यातल्या बँक खात्याला मोठी झळ नाही. क्रेडिट कार्डच्या रकमेचे काय हप्ते पडतातच. भरायचे महिन्याला तेवढे आणि काम झालं!

असं सुरूवातीला होत जातं आणि काही महिन्यांनी कर्जाचा मोठा डोंगर उभा होतो. दर महिन्याला क्रेडिट कार्डचे हप्ते भरले तरी उरलेली रक्कम काही केल्या कमी होत नाही. आणि मग वर्षनुवर्ष कर्ज फेडणं हातात राहून जातं.

क्रेडिय कार्ड हा एक सोयीचा प्रकार नक्कीच आहे. इमर्जन्सीच्या वेळेस लगेच पैसे उपलब्ध करून देणारं हे एक उत्तम साधन आहे. पण ते नीट वापरलं नाही तर फार भयानक स्थिती उभी राहू शकते. कारण क्रेडिट कार्डवरच्या रकमेवंरचं व्याज प्रचंड म्हणजे १८%  ते काही वेळा ३६% एवढं असतं. अशा कर्जाच्या चक्रात अडकणं कोणाच्याही आर्थिक स्थितीसाठी चांगली बाब नाही. त्यामुळे क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या आणि व्याजाच्या चक्रात अडकला असाल तर दोन टप्प्यांमध्ये त्यावर उपाययोजना करा.

टप्पा १: क्रेडिट कार्डवर दर महिन्याला नव्याने होणारा खर्च थांबवणं

टप्पा २: क्रेडिट कार्डवर जमा झालेल्या कर्जाचं निवारण करणं

 

टप्पा १: क्रेडिट कार्डवर दर महिन्याला नव्याने होणारा खर्च थांबवणं

१. क्रेडिट कार्डवर दररोजचा घरखर्च कधीही करू नये. किराणा माल, फोन, वीज बिल इ. साठी आपल्या पगारातले किंवा नियमित मिळकतीतून येणारीच रक्कम वापरावी.

२. क्रेडिट कार्डावर होणारा खर्च थांबवण्यासाठी दर महिन्याला येणारं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट काळजीपूर्वक पहावं. त्यात काही ‘आॅटोमेट’ केलेले खर्च आहेत का ते पाहावं. म्हणजे फोन बिल, डीटीएच बिल हे दर महिन्याला क्रेडिट कार्डद्वारे आपोआप भरलं जावं अशी आपण नकळत व्यवस्था करून ठेवलेली असते. असं ‘आॅटोमेशन’ त्वरित बंद करावं. या बिलांसाठी आॅटोमेशन करायचंच असेल तर ते तुमच्या डेबिट कार्डवर करणं कधीही उत्तम

३. आपण अनेक आॅनलाईन सर्व्हिसेसना ‘सब्सक्राईब’ करून ठेवलेलं असतं. म्हणजे नेटफ्लिक्स किंवा कोणतं आॅनलाईन मॅगझीन इ. या वर्गणीसाठीही आपण जर त्या साईटवर क्रेडिट कार्डची नोंदणी करून ठेवलेली असेल तर ती नोंदणीही रद्द करावी.

४. क्रेडिट कार्ड्सवर अनेकदा अनेक छुपे चार्जेस् असतात. हे चार्जेस् क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये दाखवलेले असतात. यावर नेहमी नजर ठेवावी आणि काही चूक आढळली तर ती कंपनीकडून दुरूस्त करून घ्यावी.

 

टप्पा २: क्रेडिट कार्डवर जमा झालेल्या कर्जाचं निवारण करणं

१. दर महिन्याला क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये दाखवलेली कमीत कमी रक्कम भरणं आवश्यक असतंच. पण फक्त तेवढीच रक्कम भरल्याने मुद्दलाची रक्कम चांगल्याप्रकारे भरली जात नाही. त्यामुळे जर क्रेडिट कार्डवर खर्च झालाच तर त्या महिन्याच्या बिलामध्येच त्या रकमेची पूर्णपणे परतफेड करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. नाहीतर व्याजाचं चक्र सुरू होतं.

२. क्रेडिट कार्ड कर्जावर किती व्याज आकारलं जात आहे. याची विचारणा क्रेडिट कार्ड कंपनीकडे करावी. त्यानंतर यापेक्षा अतिशय कमी व्याजाच्या पर्सनल लोन घेण्याचा प्रयत्न करावा. पण हे पर्सनल लोन क्रेडिट कार्डाचं कर्ज फेडण्यासाठीच तुम्ही वापरणार असाल तरच ते घेण्यात अर्थ आहे. क्रेडीट कार्डाच्या व्याजापेक्षा पर्सनल लोनचं व्याज निश्चितच कमी असतं. त्यामुळे महिन्याचा हप्ता सुलभ होऊ शकतो. तसंच प्रचंड व्याजाच्या चक्रातून मुक्तता झाल्याने लाँग टर्म फायदाही होऊ शकतो.

३. तुम्ही क्रेडिट कार्ड कर्जाचे हप्ते अतिशय शिस्तशीरपणे यापूर्वी भरत असाल तर कर्जाच्या उरलेल्या रकमेवरच्या व्याजावर काही सूट देण्यासाठी बँकेकडे तुम्ही विचारणा करू शकता. काही वेळी अशी सूट दिलीही जाऊ शकते. त्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात.

४. काही परिस्थितीमुळे जर क्रेडिट कार्ड कर्जाचे हप्ते फेडणं अगदीच जड जात असेल उदा. नोकरी जाणं, अचानक आपत्ती इ. तर बँकेकडे सेटलमेंट साठीही तुम्ही विचारणा करू शकता. यामध्ये तुमच्या उरलेल्या कर्जाच्या रकमेवर बँक सूट देऊ शकते. पण सेटलमेंटचा हा मार्ग सर्वात आणि सर्वात शेवटचा म्हणून वापरावा. याचं कारण म्हणजे तुमच्या CIBIL रिपोर्टवर यासंबंधीचा शेरा येत यापुढची महत्त्वाची कर्जं उदा. होम लोन इ. मिळवणं कठीण जाऊ शकतं.

क्रेडिट कार्ड हे फक्त आणि फक्त इमर्जन्सीसाठीच वापरायचं असतं. रोजच्या खर्चाला किंवा उगाचच्या चैनीला क्रेडिट कार्ड वापरणं म्हणजे एक मोठी रिस्क असते. गोड जाहिरातींमुळे क्रेडिट कार्ड हा एक परवलीचा शब्द झालेला असला तरी क्रेडिट कार्ड म्हणजे ‘कर्जाळू कार्ड’ असा शब्द मनात ठेवला तरी उगाच हे कार्ड वापरण्याच्या सवयीला लगाम बसू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 1:17 pm

Web Title: tips to escape credit card loan
Next Stories
1 इंग्लिश सुधारायचंय? मग हे वाचा
2 तुमच्या स्मार्टफोनमधला डेटा सुरक्षित आहे का?
3 Healthy living: स्वयंपाकाच्या गॅस-शेगडीची ज्योत तपासा
Just Now!
X