लहान मुलांना गोड खायला खूप आवडते. चॉकलेट, केक, आइस्क्रीम हे तर त्यांचे वीक पॉईंटच. मग आई-बाबा मुलांना दात किडतील म्हणून ओरडत असतात आणि मुलेही चॉकलेट खाण्याचा हट्ट करत असतात. हे चित्र आपल्याला साधारण सगळीकडे पहायला मिळते. प्रत्यक्षात गोड खाण्यामुळे दात किडतात असे नाही तर खाल्लेले योग्य पद्धतीने साफ न झाल्याने दात किडतात. आता मुलांना एखाद्या गोष्टीपासून दूर ठेवायचे असेल तर त्यासाठी त्यांना काहीतरी पर्याय द्यायला हवा. आता असे कोणते उपाय आहेत, ज्यामुळे मुले जास्त गोड खाणार नाहीत आणि तुमचाही उद्देश साध्य होईल.

१. प्रेरणा द्या

Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

मुलांना गोड नाही पण थोडे कलरफूल असलेले पदार्थ खायला द्या. त्यामुळे गोड पदार्थांकडून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळेल. यामध्ये फळे, घरच्या घरी केलेले काही आकर्षक दिसतील असे पदार्थ यांचा समावेश करु शकता. यामध्ये थोडे वेगळे रंग असल्यास मुले या पदार्थांकडे आकर्षित होतील आणि नकळत गोड खाण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होईल.

२. वेगवेगळे पर्याय द्या

मुलांना सतत पोळीभाजी किंवा भात खाणे याचा कंटाळा येऊ शकतो. अशावेळी मुले जाम, तूप-साखर पोळीसोबत खाण्यासाठी मागतात. मात्र पोळीऐवजी पराठा, फ्रँकी असे काही केल्यास मुले ते पदार्थ आवडीने खातात. त्यामुळे रोजच्या जेवणाला पर्याय उपलब्ध ठेवल्यास मुले योग्य पद्धतीने जेवण करतात आणि त्यांना पोषक आहार मिळण्यास मदत होते.

३. गोड पेयांना नाही म्हणा

शीतपेये किंवा ज्यूससारख्य पेयांमध्येही मोठ्या प्रमाणात साखर असते. बाहेर गेल्यावर मुले या गोष्टींसाठी हट्ट करतात. मात्र त्यामुळ शरीरात खूप साखर जाते. शरीरात जास्त प्रमाणात साखर गेल्यास लठ्ठपणा आणि इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे लिंबूपाणी किंवा नारळपाणी हा यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो.

४. त्यांना योग्य ती कारणे समजावून सांगा

काही पालकांकडून एखादी गोष्ट नाही म्हटल्यावर त्यासाठी खूप कडक वागणूक मिळते. एखादी गोष्ट न देण्याचा अट्टाहास केला जातो. मात्र अशामुळे मुले जास्त चिडचिड करतात. त्यामुळे त्यांना आठवड्यातून एकदा त्यांना हवा असलेला पदार्थ खाऊ द्या. मात्र आपण त्यांना तो पदार्थ का खाऊ देत नाही याचे कारण त्यांना पटवून द्या.

५. घरातील व्यक्तींच्या खाण्याच्या सवयी महत्त्वाच्या

घरात मुले सगळ्यांसोबत नाष्ता किंवा जेवण करत असताना सगळे काय खातात हे महत्त्वाचे असते. मुलांसमोर तुम्ही अति गोड पदार्थ किंवा जंक फूड खात असाल, तर तेही तेच खाण्यासाठी हट्ट करणार. त्यामुळे त्यांच्यासमोर असे पदार्थ खाणे टाळा आणि जास्तीत जास्त पौष्टीक खाण्याचा प्रयत्न करा.