07 March 2021

News Flash

या फॅशनमुळे उन्हाळ्यात मिळेल ‘कूल’ फील

हॉट दिवसांमध्ये कूल राहण्याचे काही पर्याय

उन्हाळा म्हणजे रखरखत ऊन, उष्णतेमुळे अंगाची झालेली काहिली आणि घशाला पडलेला शोष हे जणू समीकरणचं झालं आहे. असं असलं तरीदेखील हाच असा एकमेव ऋतू आहे, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या फॅशन ट्राय करु शकतो. त्यामुळे सध्याच्या काळात उन्हाळा म्हणजे फॅशनच्या दृष्टीने खरा ऋतू.

उन्हाळ्याचे दिवस अगदी प्रत्येकालाच नकोस वाटत असतात. त्याच भर दुपारी उन्हामध्ये जर कामानिमित्त बाहेर जायचं असेल तर मग विचारायलाच नको. टळटळीत उन्हामध्ये घराबाहेर जाणं शक्यतो सारेच जण टाळत असतात. उन्हामुळे सतत येणारा घाम आणि त्यामुळे येणारा चिकचिकाट प्रत्येकालाच असहाय्य करत असतो. त्यामुळे या दिवसात शक्यतो सारेच जण आरामदायी कपडे आणि फॅशन करण्याचा प्रयत्न करत असतात. विशेष म्हणजे या हॉट दिवसांमध्ये कूल राहण्याचे काही पर्याय आहेत. त्यामुळे उन्हाळ्याचा लूक कम्फर्टेबल पण स्टायलिश कसा असावा हे सुचवणाऱ्या काही टिप्स..

१. हाय हिल्स –
उन्हाळ्यामध्ये कुल लूक हवा असेल तर हाय हिल्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण सॅण्डल, चप्पल यांचा वापर करत असतो. मात्र या स्टाइलला कंटाळला असाल तर हाय हिल्स हा उत्तम पर्याय आहे. परंतु या हिल्स वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते.

२. बॉडी फिटेड ड्रेसेस –
अनेक वेळा उन्हाळ्यामध्ये आपण फिकट रंगाचे किंवा सैलसर कपड्यांची निवड करतो. मात्र या उन्हाळ्यात कूल दिसायचं असेल तर बॉडी फिटेड ड्रेसेस नक्की ट्राय करुन बघा. जर तुमचा बांधा सडपातळ असेल तर बॉडी फिटेड ड्रेसेस हा उत्तम पर्याय आहे. या ड्रेसमध्ये तुमचं सौदर्यं खुलून येत. त्यासोबतच यातदेखील फिकट रंग किंवा कॉटनचा पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या समस्या यामध्ये निर्माण होणार नाहीत. बॉडी फिटेड ड्रेसमध्ये स्कर्ट, शर्ट आणि ट्युनिक हे पर्याय उपलब्ध आहेत.

३. बुफान्ट हेअरस्टाइल –
उन्हाळ्यामध्ये मानेवर घाम येत असल्यामुळे आपण केस वर बांधतो. सतत केस बांधून राहिल्यामुळे केसांमध्ये घाम येतो. सोबतच केसांमध्ये चिकचिकाट निर्माण होतो. या साऱ्यामुळे केसांना विशिष्ट प्रकारचा उग्र वास येतो. या साऱ्या कटकटीपासून सुटका करायची असेल तर बुफान्ट हेअरस्टाइल मस्त पर्याय आहे. ६० च्या दशकामध्ये ही हेअरस्टाइल प्रचंड फेमस होती. तिच हेअरस्टाइल आता नव्याने सुरु झाली आहे. या हेअरस्टाइलमध्ये केसांचा थोडासा उंचवटा करुन ते बांधले जातात. या पद्धतीने केस बांधल्यानंतर ते एखाद्या मुकूटाप्रमाणे भासतात. विशेष म्हणजे या पद्धतीने केस बांधल्यामुळे डोक्यावर जास्त घाम येत नाही.

४. वनपीस ड्रेसेस्
उन्हाळ्यामध्ये मुली सैल कपडे घालणे पसंत करतात. त्यामध्ये उत्तम पर्याय म्हणजे वनपीस ड्रेस. यामध्ये काही पूर्ण बाह्य़ांचे तर काही स्लिव्हलेस (बाह्य़ा नसलेले) असे काही आकर्षक वनपीस सौम्य रंगामध्ये उपलब्ध आहेत.

५. मेश टॉप-
मेश हा टॉपस्चा आधुनिक प्रकार आहे. पारदर्शक असणारे अशा प्रकारचे टॉपस् सध्या महाविद्यालयीन तरुणींना भुरळ घालत आहते. या टॉपमध्ये रंगीबेरंगी स्पेगेडी (गंजी) घालणे मुली पसंत करतात. पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये काळा किंवा कोणत्याही गडद रंगाची स्पेगेडी, पांढऱ्या टॉपमध्ये काळी स्पेगेडी असे विविध रंगाचे प्रयोग यामध्ये करू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 3:49 pm

Web Title: tips to upgrade your fashion and dressing style
Next Stories
1 आता Google Pay वरुनही करा रेल्वे तिकीट बुकिंग
2 कलिंगड खा अन् वजन घटवा, जाणून घ्या कसे
3 हे सॅण्डविच खाल्लं तर नक्कीच वजन होईल कमी
Just Now!
X