News Flash

अभिनेत्री टिस्का चोप्राने शेअर केलं तजेलदार त्वचेचं रहस्य..

फळांचा आहारात समावेश करून घेतल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ति वाढतेच आणि जीवनसत्त्वेही मिळतात.

अभिनेत्री टिस्का चोप्रा सांगते की तुम्ही ऋतूनुसार फळे खाल्ली तर तुमच्या त्वचेचे आतून हायड्रेट करण्यास देखील फळे मदत करतात

निरोगी त्वचा हि फक्त चांगली प्रसाधनं वापरूनच मिळवता येत नाही तर आपल्या जीवन शैलीच्या सवयीनुसार आणि योग्य पोषक आहारातून देखील चांगली त्वचा हि ठेवता येते, खरं तर असं नेहमीच म्हटलं जातं की आपण जे पौष्टिक अन्न आहारात खातो त्यांचे आपल्या चेहर्‍यावरील त्वचेवर देखील चांगला परिणाम पहिला मिळतो.

अलीकडेच अभिनेत्री टिस्का चोप्राने, आपल्या रोजच्या आहारातून देखील त्वचेचे पोषण करणे महत्वाचे असल्याचं सांगत त्वचेचं आरोग्य कसं राखायचे याचा मंत्र दिला आहे. एकीकडे त्यांच्या तेजस्वी चमकदार त्वचेची काळजी कशी घेता या बद्दल विचारले असता, त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे हंगामी फळे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही हंगामी फळांचा वापर केल्याने त्वचेला चांगले पोषण मिळून त्वचा चमकदार बनते, असे सांगत काळी द्राक्षे, टरबूज, लिची अश्या आवडत्या फळांचा समावेश करून तजेलदार चेहर्‍यामागचे रहस्य संगितले. या फळांचा आहारात समावेश करून घेतल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ति वाढतेच आणि जीवनसत्त्वे मिळते. असा हा पॉवर पॅक असल्याचं ४७ वर्षीय असलेल्या अभिनेत्री टिस्का चोप्रा यांनी संगितले.

फळांमध्ये अँटिऑक्सिडंट असल्याने फळांचं सेवन केल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात. शरीरात नवीन मुक्त पेशीसमूह तयार होऊन आपल्याला तजेलदार तेजस्वी त्वचा मिळते. दरम्यान फळे खाल्याने त्यातील जीवनसत्व आणि फायबरयुक्त हे बराच काळ आपल्याला तृप्त ठेवते. जर तुम्ही खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही तर त्वचेवर डाग किंवा मुरुम दिसू शकतात. याव्यतिरिक्त जर तुम्ही भरपूर पाणी आणि योग्य प्रमाणात व नियमित फळे खाल्याने आणि त्यात जर तुम्ही ऋतूनुसार फळे खाल्ली तर तुमच्या त्वचेचे आतून हायड्रेट करण्यास देखील फळे मदत करतात. ज्याने तुमच्या त्वचेला पुनरुज्जीवन मिळते. याने तुमची त्वचा ही नेहमी निरोगी आणि तेजस्वी राहील, त्यामुळे आपल्या आहारात किंवा नाष्ट्यात फळांचा समावेश असणे आवश्यक आहे.

अजून काय? ते अत्यंत चवदार देखील आहेत! असं आपल्या त्वचेचं रहस्य सांगून त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट करून फळ खायला चवदार आणि पौष्टिक असल्याचं सांगितले,

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 5:42 pm

Web Title: tisca chopra share secret to glowing skin scsm 98
Next Stories
1 चिया सीड्सचे फायदे आणि अतिवापरामुळे होणारे नुकसान: जाणून घ्या
2 Yoga Day 2021 : घरुन काम करताना किंवा ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या जागी करता येतील अशी योगासने
3 International Yoga Day 2021: ही दहा योगासने करा अन् अनेक आजारांपासून मुक्ती मिळवा
Just Now!
X