देशात करोना संकटामुळे आर्थिक संकट ओढावलं असून अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावव्या लागल्या आहेत. अशातच ठाणे महानगर पालिकेत १९०१ विविध जागांची भरती निघाली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा ११ जुलै अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
इन्टेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी -एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी – आयुष, नर्स-जीएनएम, नर्स एएनएम, सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर, बायोमेडिकल इंजिनियरिंग, बायोमेडिकल असिस्टंट, एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स, एचआर मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, डी ईसीओ टेक्नीशियन, मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट, एक्स-रे टेक्नीशियन, डायलिसिस तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, सीएसएसडी तंत्रज्ञ, एमजीपीएस तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, हार्डवेअर व नेटवर्किंग अभियंता पदांच्या एकूण १९०० पेक्षा जास्त रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट: खुल्या प्रवार्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवार्गासाठी ४३ वर्षे.
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा : https://est.tmconline.in/
अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/
नोकरीचे ठीकाण – ठाणे
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2020 9:09 am