24 November 2020

News Flash

सिगारेटच्या पाकिटावर आता टोल फ्री क्रमांक आणि प्रबोधनात्मक चित्र

सप्टेंबरपासून होणार अंमलबजावणी

सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक असते हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र तरीही व्यसन असणाऱ्यांना त्याचे भान राहत नाही. इतकेच काय सिगारेटच्या पाकीटावरही ती ओढणे आरोग्यासाठी हानिकारक असते असे लिहीलेले असते. मात्र तरीही त्याचा नाद सोडणे सवय असलेल्या लोकांसाठी कठिणच. हे लक्षात घेऊन आता सरकारने एक अनोखा नियम लागू केला आहे. ज्यांना सिगारेट आणि तंबाखूचे व्यसन आहे त्यांच्यासाठी आता या उत्पादनांवर एक टोल फ्री क्रमांक दिला जाणार आहे. आपले व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी १८००-११-२३५६ हा टोल फ्री क्रमांक अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास व्यक्तीचे मोफत समुपदेशन केले जाणार आहे.

याबरोबरच सिगारेट आणि तंबाखूच्या पाकीटावरील ८५ टक्के भागात हे व्यसन वाईट आहे हे दाखविणारे एक प्रतिकात्मक छायाचित्रही देण्यात येणार आहे. या चित्राचाही व्यसन सोडायचे असणाऱ्यांना सकारात्मक उपयोग होईल असा अंदाज आहे. तसेच यावर काही प्रबोधनात्मक संदेशही देण्यात आले आहेत. तंबाखू हे मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे, तंबाखूमुळे कर्करोग होऊ शकतो असे हे संदेश आहेत. हे सगळे बदल येत्या सप्टेंबर महिन्यापासून लागू होणार असून संबंधित कंपन्यांना त्याप्रमाणे सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबतचा अध्यादेश जाहीर कऱण्यात आला असून त्यामध्ये याबाबतची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 6:10 pm

Web Title: toll free no for counselling and pictorial images and text messages will be there on tobacco packs from september
Next Stories
1 सलमानचे जोधपूर तुरुंगातील फोटो पाहिलेत का?
2 FB बुलेटीन: सलमानला शिक्षा, राष्ट्रकुलमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी आणि अन्य बातम्या
3 बॉलिवूडचा ‘टायगर’ आजची रात्र जेलमध्ये काढणार
Just Now!
X