तुम्ही दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम जास्त वेळ बघत असलात तर सावधान.. तीन तासांहून अधिक काळ किंवा दिवसभरात त्याहून अधिक वेळ तुम्ही दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम बघण्यात ‘टाइमपास’ करीत असाल तर तुम्हाला मृत्यूने लवकर गाठण्याचा धोका दुप्पट असल्याचा निष्कर्ष येथील अभ्यासकांनी काढला आहे. विशेषत: प्रौढांनी हा इशारा गांभीर्याने घ्यावा, असा इशारा देण्यात आला आहे.
दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम अधिक वेळ पाहण्यात प्रौढांनी वेळ घालविण्यापेक्षा व्यायाम आणि अन्य बाबींमध्ये लक्ष केंद्रित करावे. केवळ एक ते दोनच तास दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम बघावेत, असेही आवाहन संबंधित संशोधकांनी केले आहे. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम बघणे हे बैठय़ा स्वरूपाचे असल्यामुळे सगळीकडेच हा कल वाढत आहे, असे एका अभ्यासाअंती आढळून आले आहे.
‘मार्टिनेझ-गोन्झेल्झ’ या संस्थेच्या वतीने विविध भागांत ही पाहणी करण्यात आली. त्यामध्ये दोन ते तीन तासांहून अधिक काळ दूरचित्रवाणी पाहणाऱ्या लोकांच्या सवयीचा अभ्यास करण्यात आला असता, ही बाब आढळून आली.