फोन ही चैनीची वस्तू झाली नसून २१ व्या शतकात राहणाऱ्या प्रत्येकाची गरज बनली आहे. पूर्वी फोनच्या किंमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नव्हता. पण जसजशी मागणी वाढली तशा जास्तीत जास्त कंपनी मोबाईल मार्केटमध्ये उतरल्या. ग्राहकांना पर्याय मिळू लागले. फोन जाऊन त्याची जागा अँड्राईड फोनने घेतली. आज अँड्राईड फोन विकत घ्यायचे झाले तर शेकडो पर्याय तुम्हाला बाजारात मिळतील. तेव्हा तुम्हीही बजेटमध्ये फोन शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही पर्याय आणले आहे. ज्यात फक्त १० हजारांत किंवा त्याहून कमी किंमतीत तुम्ही हे स्मार्टफोन विकत घेऊ शकता. अर्थात हे फक्त पर्याय आहेत, जर तुम्ही स्वस्तात मस्त फोन विकत घेण्याच्या विचारात आहेत तर या पर्यायांचा विचार करू शकता.

झोपो कलर एम फाइव्ह
झोपो या कंपनीने ‘एम फाइव्ह’ हा सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत मोबाइल उपलब्ध केला आहे. यात पाच इंचाचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. झोपोने यात मीडिआटेकचा एमटी ६७३७ एम हा प्रोसेसर वापरला आहे. हा मोबाइल अ‍ॅण्ड्रॉइड सिक्स या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. या मोबाइलमध्ये वन जीबी रॅम आणि १६ जीबी मेमरी देण्यात आली आहे. या मोबाइलमध्ये दोन सिम कार्डची सुविधा आहे तसेच मोबाइलचे स्टोरेज मेमरी कार्डच्या साहाय्याने ६४ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या मोबाइलमध्ये मागील बाजूस पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि फ्लॅश देण्यात आले आहे तर पुढील बाजूस दोन मेगापिक्सएलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात २१०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या मोबाइलमध्ये फोरजी विओएलटीई, एलटीई, थ्रीजी, टूजी देण्यात आले आहे. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम आहे. झोपो कलर एम फाइव्हमध्ये सगळ्या प्रकारचे महत्त्वाचे सेन्सर्स देण्यात आले आहेत. झोपो कलर एम फाइव्ह पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. तो ऑनलाइन खरेदी करता येऊ शकतो.
झोपो कलर एम फाइव्ह किंमत : रु. ६,५००/-
स्वाइप इलाइट सेन्स
स्वाइप इलाइट सेन्स हा सर्वसामान्यांना परवडेल असा स्वस्त मोबाइल भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. यात ५ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्वाइप इलाइट सेन्समध्ये थ्री जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी देण्यात आली आहे . स्वाइप इलाइट सेन्समध्ये दोन सिम कार्डची सुविधा आहे. परंतु तुम्ही एका वेळी दोन सिम कार्ड किंवा एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरू शकता. यात तुम्ही मेमरी कार्डच्या साहाय्याने स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात स्नॅपड्रॅगॉनचा ४२५ क्वॉड कोर हा प्रोसेसर वापरण्यात आला आहे ज्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनात मोबाइलचा वापर विनाअडथळा करू शकता. हा मोबाइल अँड्रॉइड ६.०.१ या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. कॅमेराच्या बाबतीत यात १३ मेगापिक्सेलचा मागील बाजूस कॅमेरा आणि फ्लॅश देण्यात आला आहे तसेच पुढील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. शिवाय यात २५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत त्यात फोरजी विओएलटीई, एलटीई, थ्रीजी, टूजी देण्यात आले आहे. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम आहे. हा मोबाइल राखाडी आणि पांढरा या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा मोबाइल ऑनलाइन उपलब्ध आहे.
स्वाइप इलाइट सेन्स किंमत रु. ७,४९९ /-

पॅनासॉनिक इलुगा रे एक्स
पॅनासॉनिक या कंपनीने दुसरा नवीन मोबाइल बाजारात आणला आहे ज्याचं नाव पॅनासॉनिक इलुगा रे एक्स. यात ५.५ इंचचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे आणि आयपीएस ग्लास वापरण्यात आला आहे. पॅनासॉनिकने यात मीडिआटेक चा एमटी ६७३७ हा प्रोसेसर आणि माली टी ७२० हा जीपीयू वापरण्यात आला आहे. हा मोबाइल अ‍ॅण्ड्रॉइड सिक्स या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. या मोबाइलमध्ये थ्री जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी देण्यात आली आहे. या मोबाइलमध्ये दोन सिम कार्डची सुविधा देण्यात आली आहे. मोबाइलचे स्टोरेज तुम्ही मेमरी कार्डच्या सहाय्याने ६४ जीबीपर्यंत वाढवू शकता. या मोबाइलमध्ये १६ मेगापिक्सेलच्या मागील बाजूस कॅमेरा आणि फ्लॅश देण्यात आला आहे तसेच पुढील बाजूस पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि फ्लॅश देण्यात आला आहे ज्यामुळे तुमचे फोटो अधिक चांगले येण्यास मदत होईल. यात ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. पॅनासॉनिक कंपनीने या मोबाइलमध्ये आरबो नावाचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरला आहे. ज्याच्या मदतीने वापरकर्ता हा मोबाइल अधिक सोप्या पद्धतीने वापरू शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी त्यात फोरजी व्हीओएलटीई, एलटीई, थ्रीजी, टूजी देण्यात आले आहे. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम आहे. पॅनासॉनिक इलुगा रे एक्समध्ये सगळ्या प्रकारचे महत्त्वाचे सेन्सर्स देण्यात आले आहेत. या मोबाइलच्या पुढील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. पॅनासॉनिक इलुगा रे एक्स फक्त ऑनलाइन उपलब्ध आहे. सोनेरी आणि राखाडी रंगात उपलब्ध आहे.
पॅनासॉनिक इलुगा रे एक्स – किंमत रु ८,९९९/-

कुलपॅड नोट फाइव्ह लाइट
कुलपॅड नोट फाइव्ह लाइट या मोबाइलमध्ये पाच इंचांचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनवर असलेल्या २.५ डी ग्लासमुळे मोबाइलस्क्रीन अधिक सुंदर व आकर्षक झाली आहे. या मोबाइलमध्ये थ्री जीबी रॅम आणि १६ जीबी मेमरी आणि दोन सिम कार्डची सोय आहे. मोबाइल स्टोरेज तुम्ही मेमरी कार्डच्या साहाय्याने ६४ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात मीडिआटेकचा एमटी ६७३५ सीपी हा प्रोसेसर आणि माली टी ७२० हा जीपीयू वापरण्यात आला आहे. हा मोबाइल अँड्रॉइड ६.०.१ या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. यात मागील बाजूस तेरा मेगापिक्सेलचा तर पुढील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा तसेच दोन्हीकडे फ्लॅश देण्यात आला आहे. शिवाय यात २५०० एमएएचची बॅटरी आहे. यात फोरजी व्हीओएलटीई, एलटीई, थ्रीजी, टूजी आहे. तसेच वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम आहे. विशेष म्हणजे तुम्ही तुमचा पेन ड्राइव्ह या मोबाइलला जोडू शकता. मोबाइलच्या मागील बाजूस िफगरिपट्र स्कॅनर देण्यात आले आहे. हा मोबाइल सोनेरी आणि राखाडी रंगांमध्ये उपलब्ध आहे. कुलपॅड नोट फाइव्ह लाइट हा मोबाइल ऑनलाइन उपलब्ध आहे.
कुलपॅड नोट फाइव्ह लाइट – किंमत रु. ८,१९९/-

इंटेक्स अँक्वा ट्रेण्ड लाइट
इंटेक्स या कंपनीने अँक्वा ट्रेण्ड लाइट हा नवीन आणि स्वस्त मोबाइल आणला आहे. यात पाच इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात वन जीबी रॅम आणि आठ जीबी मेमरी देण्यात आली असून मेमरी कार्डचा वापर करून फोनची मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढवता येईल. यात दोन सिम कार्डची सुविधा आहे. इंटेक्सने यात मीडिआटेकचा एमटी ६७३७ एम हा प्रोसेसर आणि माली टी ७२० हा जीपीयू वापरला आहे. तो अँड्रॉइड ६.०.१ या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. यात मागील बाजूस पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा तर पुढील बाजूस दोन मेगापिक्सएलचा कॅमेरा आणि दोन्हीकडे फ्लॅश देण्यात आला आहे. यात २६०० एमएएचची बॅटरी आहे. फोरजी व्हओएलटीई, एलटीई, थ्रीजी, टूजी आहे. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम आहे. सोनेरी रंगामध्ये उपलब्ध असलेला हा मोबाइल ऑफलाइन म्हणजेच दुकानांत उपलब्ध आहे.
इंटेक्स अँक्वा ट्रेंड लाइट – किंमत : रु. ५६९०/-

रेडमी फोर ए
शिओमी कंपनीने रेडमी फोर ए हा स्वस्त मोबाइल भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून दिला आहे. यात पाच इंचांचा एचडी डिस्प्ले आहे. रेडमी फोर एमध्ये टू जीबी रॅम आणि १६ जीबी मेमरी देण्यात आली आहे. त्यात एका वेळी दोन सिम कार्ड किंवा एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरता येईल. यात तुम्ही मेमरी कार्डच्या साहाय्याने स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. शिओमीने यात स्नॅपड्रॅगॉनचा ४२५ क्वाड कोर हा प्रोसेसर आणि अड्रिनो ३०८ हा जीपीयू वापरण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनात मोबाइलचा वापर विनाअडथळा करू शकता. हा मोबाइल अँड्रॉइड ६.०.१ या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. यात मागील बाजूस तेरा मेगापिक्सएलचा कॅमेरा आणि फ्लॅश देण्यात आला आहे तसेच पुढील बाजूस पाच मेगापिक्सएलचा कॅमेरा देण्यात आला आहे. शिवाय यात ३१२० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्ही दिवसभर मोबाइलचा उपयोग करू शकता. यात फोरजी व्हीओएलटीई, एलटीई, थ्रीजी, टूजी देण्यात आले आहे. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम आहे. यात दिलेल्या आयआर ब्लास्टरमुळे त्याचा उपयोग स्मार्ट रिमोटसारखा करता येईल. हा मोबाइल बनविण्यासाठी पॉलिकाबरेनेट हे मटेरियल वापरण्यात आले आहे. हा मोबाइल राखाडी, सोनेरी, गुलाबी या तीन रंगांमध्ये तसंच ऑनलाइन उपलब्ध आहे.
रेडमी फोर ए – किंमत : रु. ५,९९९/-

रेडमी नोट फोर
स्वस्त, सुंदर, टिकाऊ या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून शिओमीने ‘रेडमी नोट थ्री’ची पुढची आवृत्ती ‘रेडमी नोट फोर’ मार्च महिन्यात भारतात लाँच केली. ‘रेडमी नोट फोर’चे तीन प्रकार उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात टू जीबी – थ्री जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी, फोर जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असे तीन प्रकार निवडू शकता. पण तुम्हाला बजेटमध्ये फोन बघायचा असेल तर टू जीबी – थ्री जीबी रॅम निवडू शकता. हा मोबाइल पूर्णपणे मेटलचा बनविण्यात आला आहे. शिओमीने यात स्नॅपड्रॅगॉनचा ६२५ ऑक्टा कोर हा प्रोसेसर आणि अड्रिनो ५०६ हा जीपीयू वापरला आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाइलमधील गेम्स अधिक चांगल्या प्रकारे आणि विनाअडथळा खेळू शकता तसेच नेहमीच्या वापरातील लहान, मोठे अ‍ॅपसुद्धा सहज वापरू शकता. या प्रोसेसरचे वैशिष्टय़े असे की हा खूप कमी वीज वापरतो, ज्यामुळे कमी बॅटरीचा उपयोग होतो आणि तुम्ही तुमच्या मोबाइलचा वापर अधिक काळ करू शकता.
रेडमी नोट फोर टू जीबी रॅम / ३२ जीबी मेमरी : किंमत- रु. ९,९९९/-

सॅमसंग J1 4G
जे सिरीज हे सॅमसंग स्मार्टफोनमधले सगळ्यात स्वस्त फोन होय. १.३ GHz क्वाड कोअर प्रोसेसर, ७६८ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल रॅम असं या फोनचं वैशिष्ट्ये आहे. त्याशिवाय ५ मेगापिक्सेल कॅमेरा २ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरादेखील या फोनमध्ये आहे. गोल्ड, ब्लॅक, व्हाईट या रंगात हा फोन उपलब्ध आहे.
सॅमसंग J1 4G – किंमत : रु. ६,८९०

गॅलेक्सी J3 pro
पाच इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल स्टोअरेज आणि २५६ जीबी एक्सपांडेबल मेमरीअसं या फोनचं वैशिष्ट्ये. शिवाय ८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा या फोनमध्ये असणार आहे.
गॅलेक्सी J3 pro – किंमत : 7,990

गॅलेक्सी J2 ace
जे सिरीज मधला तिसरा फोन आहे तो गॅलेक्सी J2 ace. पाच इंचाचा डिस्प्ले, १.५ जीबी रॅम, ८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ४ जी सपोर्ट आणि बाईक मोड हे या फोनचं वैशिष्ट्ये आहे. त्यातून बाईक मोड हे फिचर सगळ्यांहून वेगळं आहे. म्हणजे समजा तुम्ही गाडी चालवत असाल आणि फोन आलाच तर या फिचरमुळे तुम्ही गाडी चालवत आहात हे फोन करणाऱ्याला समजेल.
गॅलेक्सी J2 ace : किंमत – ८,४९० रु.