News Flash

1 हजारापेक्षा कमी किंमतीत मिळणारे टॉप 5 वाय-फाय हॉटस्पॉट

नेमकं कोणतं वाय-फाय हॉटस्पॉट घ्यावं याबाबत ग्राहकांना संभ्रम असतो

(संग्रहित छायाचित्र)

आजच्या इंटरनेटच्या जगात वायफाय वापरण्याचेही ग्राहकांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. पण नेमकं कोणतं वाय-फाय हॉटस्पॉट घ्यावं याबाबत ग्राहकांना संभ्रम असतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला १ हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळाणाऱ्या वायफाय हॉटस्पॉट डिव्हाइसविषयी माहिती देणार आहोत.

जियो वाय-फाय हॉटस्पॉट एमटूएस: 949 रुपये
जियोचा हा वाय-फाय हॉटस्पॉट डिव्हाइस ९४९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याद्वारे 150 एमबीपीएसपर्यंत डाउनलोड स्पीड आणि 50 एमबीपीएस अपलोड स्पीड भेटेल. या डिव्हाइससोबत एकसाथ 10 डिव्हाइस कनेक्ट करता येऊ शकतात. यामध्ये देण्यात आलेली 2300 एमएएच बॅटरी 6 तासांपर्यंत कार्यरत राहते.

एयरटेल 4जी हॉटस्पॉट
एअरटेलचं हे वाय-फाय हॉटस्पॉट डिव्हाइस प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही सिमवर काम करतं. या डिव्हाइससोबत एकसाथ 10 डिव्हाइस कनेक्ट करता येऊ शकतात. या डिव्हाइसची बॅटरी सहा तास चालते असा दावा एअरटेलने केला आहे.

जियोफाय 4जी हॉटस्पॉट जेएमआर 815 : 949 रुपये
जियोफाय 4जी हॉटस्पॉट जेएमआर 815 हे डिव्हाइस तुम्हाला अॅमेझॉन इंडियावर 949 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याद्वारेही १० डिव्हाइस कनेक्ट करता येतात. यामध्ये देण्यात आलेली 3000 एमएएच बॅटरी 8 तासांपर्यंत कार्यरत राहते.

प्रोलिंक पीआरटी 7001 एच : 999 रुपये
प्रोलिंकच्या या पोर्टेबल एचएसपीए आणि वाय-फाय 3 जी हॉटस्पॉट डिव्हाइसमध्ये 2200 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. याद्वारे 21.6 एमबीपीएसपर्यंत इंटरनेट स्पीड भेटेल. या डिव्हाइसमध्ये केवळ एका सिमकार्डचा वापर करता येतो.

डी-लिंक डीडब्ल्यूआर-720 : 800 रुपये
डी -लिंक कंपनीचं हे डिव्हाइस वाय-फाय हॉटस्पॉटसाठी उत्तम पर्याय आहे. ebay.in या संकेतस्थलावर हे डिव्हाइस 800 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 2000 एमएएच बॅटरी असलेल्या या डिव्हाइसद्वारे 21 एमबीपीएसपर्यंत इटरनेट स्पीड मिळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 1:20 pm

Web Title: top 5 wi fi hotspot under 1 thousand rupee
Next Stories
1 फेसबुक घेऊन येतंय चांगल्या आठवणींचा लेखाजोखा मांडणारं नवं पेज
2 करिअर विशेष : पत्रकार व्हायचंय?
3 योगसाधनेने शुक्राणूंच्या दर्जात सुधारणा
Just Now!
X