सध्याच्या जीवनशैलीनुसार, महिलासुद्धा पुरूषांच्या बरोबरीने संसाराचा आर्थिक डोलारा सांभाळताना दिसतात.  घरातील आणि कामावरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या नादात कामावर जाणाऱ्या महिलांना स्व:तच्या सौदर्यांची काळजी घेण्यासाठी विशेष असा वेळ देता येत नाही.  वर्किंग वुमन्सना आपल्या चेहऱ्यावरची चमक आणि तजेला कायम राखता यावा यासाठी काही मोजक्या ब्युटी टिप्स.
सॉल्ट स्प्रे – नैसर्गिकपणे केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. केसांवर सॉल्ट स्प्रेच्या फवारणीमुळे केसांचा नैसर्गिक पोत राखण्यास मदत होते.
ड्राय शाम्पू-  शाम्पूचा अशाप्रकाचा वापर तुमच्या केसांसाठी वंगण म्हणून काम करतो. तसेच केसांच्या मुळांना बळकटी देण्यासाठी ड्राय शाम्पू  उपयुक्त ठरू शकतो. पाण्याचा वापर न करता ३० सेकंदांसाठी शाम्पू तुमच्या केसांना लावून ठेवावा आणि त्यानंतर केस धुवून टाकावेत.
वॉटरप्रुफ मस्कारा-  डोळ्यांच्या पापण्यांसाठी वॉटरप्रुफ मस्कारा अत्यंत उपयुक्त आहे.  वॉटरफ्रुप मस्कारा तोंड धुतल्यानंतरही सहजासहजी निघून जात नसल्याने, बराच काळापर्यंत तुमचे डोळे आकर्षक दिसण्यास मदत होते.
 हेडबँड-  साधारणत: प्रवास करताना किंवा खेळताना केस डोक्यावर बांधून ठेवण्यासाठी मुली हेडबँड किंवा बंदाना वापरतात. मात्र, डोक्यावरील खराब केस लपविण्यासाठीदेखील याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
टिन्टेड लीप बाम- फुटलेले ओठ ही एक सर्वसामान्य समस्या आहे. बराच काळ उन्हामध्ये किंवा बाहेर राहिल्यानंतर ओठ शुष्क आणि कोरडे होतात. टिन्टेड लीप बाम ओठांसाठी मॉश्चराईजरचे काम करतो. तसेच टिन्टेड लीप बामच्या वापराने   ओठांचा रंग गडद होण्यास मदत होते, त्यामुळे एकुणच सौदर्यांत भर पडते.
सन प्रोटेक्शन फॉर हेअर- कामानिमित्त सतत उन्हात किंवा बाहेर फिरल्याने केस राठ होऊन त्यांचा नैसर्गिक रंग फिकट होतो. अशावेळी बाजारात उपलब्ध असणारी विविध कंपन्यांची सन प्रोटेक्शन फॉर हेअर उत्पादने तुमच्या मदतीला येऊ शकतात. यांच्या वापरामुळे तुमच्या केसांची नैसर्गिक चमक कायम राहण्यास मदत होते. मात्र, अशी उत्पादने खरेदी करताना ती सहजपणे केसांवर लावणे जितके महत्वाचे असते, तितकाच या उत्पादनांचा दर्जासुद्धा महत्वाचा असतो हे लक्षात ठेवा.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?