News Flash

‘टोयोटा’च्या Innova आणि Fortuner च्या किंमतीत बदल, एक जूनपासून नवीन किंमती झाल्या लागू

'टोयोटा किर्लोस्कर मोटर'ने (TKM) भारतात आपल्या वाहनांच्या किंमतीत केला बदल

‘टोयोटा किर्लोस्कर मोटर’ने (TKM) भारतात आपल्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने Toyota Vellfire आणि Camry च्या किंमतीत बदल केलेला नाही. पण Glanza, Yaris, Innova Crysta, Innova Touring Sport आणि Fortuner BS6 या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने या गाड्यांच्या किंमतीत 1 ते 2 टक्के वाढ केली असून 1 जून 2020 पासून नवीन किंमती लागू झाल्या आहेत.

Fortuner BS6 च्या विविध व्हेरिअंटची किंमत आता 28.66 लाख ते 34.43 लाख रुपये झाली आहे. आतापर्यंत फॉर्च्युनरची किंमत 28.18 लाख ते 33.95 लाख रुपये होती. याशिवाय पर्ल व्हाइट कलर असलेली Fortuner SUV खरेदी करण्यासाठी या किंमतीवरही अतिरिक्त पैसे मोजावे लागतील असे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय अन्य गाड्यांच्या किंमतीही वाढल्या असून आता Toyota Glanza ची एक्स शोरूम किंमत 7.01 लाख, Innova Crysta ची किंमत 15.66 लाख आणि Yaris ची किंमत 8.86 लाख रुपयांपासून सुरू होते. तर, Innova Touring Sport ची बेसिक एक्स शेारूम किंमत 19.53 लाख रुपये झाली आहे.

का वाढवल्या किंमती :-
एक एप्रिल 2020 पासून भारतात वाहनांच्या इंजिनसाठी ‘बीएस 6’ निकष लागू झाल्यापासून ऑटोमोबाइल कंपन्यांनी आपले अनेक मॉडेल्स बंद केले आहेत. इंजिनसाठी BS6 निकष लागू झाल्यामुळे इंजिन अपडेटचा खर्च वाढलाय परिणामी किंमतीत वाढ करण्यात आली आहे. कंपनीने Camry आणि Vellfire च्या किंमतीत वाढ केलेली नाही. या दोन्ही गाड्यांची एक्स-शोरुम किंमत अनुक्रमे 37.88 लाख आणि 79.50 लाख रुपये आहे. याशिवाय कंपनी लवकरच Toyota Urban Cruiser ही नवीन गाडी लाँच करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 2:59 pm

Web Title: toyota india hikes prices of its cars innova crysta fortuner and glanza costlier now sas 89
Next Stories
1 हिंग खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत
2 3100 रुपयांनी झाला स्वस्त झाला Xiaomi चा 108MP कॅमेऱ्याचा स्मार्टफोन !
3 OnePlus 8 चा आज ‘सेल’, मिळतायेत अनेक शानदार ऑफर
Just Now!
X