मोबाईल ही सध्या आपल्यातील अनेकांसाठी एक महत्त्वाची गोष्ट झाली आहे. सोशल मीडियामुळे तर झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येकाच्या हातात दिवसातील कितीतरी काळ मोबाईल असतो. आपली दिवसभरातील अनेक महत्त्वाची कामे हा एक फोन अगदी झटक्यात करतो. हाच फोन हरवला की मात्र त्या व्यक्तीची अगदी वाईट अवस्था होते. सतत फोनची सवय असणाऱ्यांना तर जगणेच थांबल्यासारखे वाटते. महागाचा फोन हरवल्याचे दु:ख तर असतेच. पण त्याचबरोबर मोबाईलमधला सगळा डेटा गेल्याचे दु:ख जास्त असते. आपला हरवलेला फोन सापडवणे हे वाटते तितके सोपे नाही. पोलिसात तक्रार दिल्यावर पुढे एखादा चोर सापडला आणि त्याने कबुली दिल्यावर हा फोन पुन्हा मिळाला तरच. पण हे सगळे व्हायला कितीही वर्षं लागू शकतात. पण तुमचा मोबाईल हरवला असेल तर चिंता करु नका. गुगलने यासाठी एक खास सुविधा आणली आहे. गुगल मॅपच्या मदतीने हरवलेला अँड्रॉईड फोन तुम्हाला सापडू शकणार आहे.

ज्याप्रमाणे अॅपलमध्ये फाईंड माय फोन हे फिचर आहे, त्याचप्रमाणे अँड्रॉईड फोनमध्ये असलेल्या Find your phone या पर्यायाचा वापर करुन तुम्हाला तुमचा फोन परत मिळवता येणार आहे. तुम्ही नियमित ज्याठिकाणी जाता त्या सगळ्या जागा या फिचरव्दारे ट्रॅक होणार आहेत. गुगल मॅपच्या साह्याने तुमच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक होऊन तुम्हाला हा फोन सापडवता येऊ शकतो. यासाठी तुमच्याकडे इंटरनेट आणि हरवलेल्या मोबाईलवर गुगल अकाऊंट असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला खालील टप्प्यांचा अवलंब करावा लागणार आहे. या

१. http://www.maps.google.co,in ही लिंक कोणताही कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनमध्ये ओपन करा.

२. तुमच्या मोबाईलवर जे गुगल अकाऊंट लॉगइन असेल ते अकाऊंट लॉग इन करा.

३. Your timeline या पर्यायावर क्लिक करा.

४. तुमच्या डिव्हाईसचे लोकेशन तपासण्यासाठी याठिकाणी वर्ष, महिने आणि तारीख याठिकाणी टाका.

५. लोकेशन हिस्ट्रीबरोबरच गुगल मॅप त्या फोनचे आताचे लोकेशनही दाखवू शकेल.

६. ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी तुमचा हरवलेला मोबाईल सुरु असणे आणि त्याची लोकेशन सर्व्हीस सुरु असण्याची आवश्यकता आहे.