18 October 2019

News Flash

लग्नासाठी ग्लॅमरस आणि तितकाच पारंपरिक लूक हवाय? मग या टिप्स नक्की वाचा

अभिनेत्री करिना कपूर, ऐश्वर्या राय, आलिया भट्ट, मलायका अरोरा, मीरा राजपूत, क्रिती सॅनॉन, दिशा पटानीचा पारंपरिक लूक

करिना कपूर, ऐश्वर्या राय, आलिया भट्ट, मीरा राजपूत

डिसेंबर-जानेवारीपासून लग्न सराईला सुरुवात होते. लग्नात सुंदर, सगळ्यांपेक्षा हटके ड्रेस घातला की मुली काही वेगळाच भाव खाऊन जातात. त्यासाठी प्रत्येक लग्नात नक्की कोणता ड्रेस घालायचा असा प्रश्न मुलींसमोर उभा असतो. अशा वेळी आपण बॉलिवूडच्या फॅशन आयकॉन असणाऱ्या अभिनेत्रींना फॉलो करतो.

प्रसिद्ध उद्योपती मुकेश अंबानी यांचा पुत्र आकाश अंबानीच्या लग्नात अनेक बॉलिवूड तारे-तारकांनी हजेरी लावली. त्यात अभिनेत्री करिना कपूर, ऐश्वर्या राय, आलिया भट्ट, मलायका अरोरा, मीरा राजपूत, क्रिती सॅनॉन, दिशा पटानी यांनी घातलेल्या पारंपरिक पण तितक्याच मॉर्डन वाटणाऱ्या लेहेंग्याने अनेकांना भुरळ घातली. या अभिनेत्री अत्यंत स्टनिंग, सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत होत्या. जर तुम्हाला लाल आणि हिरव्या रंगाची परंपरा मोडायची असेल तर तुम्ही या अभिनेत्रींचा लूक पाहू शकता.

बॉलिवूडची स्टाईलीश अभिनेत्री करिना कपूर खान आणि बहिण करिश्मा कपूरसह आकाश अंबानीच्या लग्नाला पोहोचली होती. करिनाने आकाशी रंगाचा लेहेंगा आणि गळ्यात चोकर घातलं होतं. त्यात ती अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. तिचा हा लुक तुम्ही जवळच्या लग्नात फॉलो करु शकता. विशेष म्हणजे करिनानं ज्या पद्धतीनं तिचा दुपट्टा कॅरी केला होता त्यामुळे पारंपरिक लेंहग्याला एक ग्लॅमरस टच मिळाला होता. करिनासोबत मलायकानं देखील हिच स्टाइल फॉलो केली होती.

अंबानी परिवाराच्या लग्नात ऐश्वर्या राय बच्चनने घेतलेला ड्रेस सर्वाना आकर्षित करत होता. गुलाबी रंगाचा लेहेंगा, त्यावर नाजूक गळ्यातलं, लाल रंगाची लिप्स्टिक आणि मोकळे केस असा हा तिचा सुंदर असा लुक होता. तुम्ही हा लुक एखाद्या लग्नात करु शकता.

View this post on Instagram

✨💖✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

फिंकट रंगाचा लेहेंगा, त्यावर भडक रंगाची ओठणी, हातात एक कडा आणि एका बाजूने मोकळे केस अशा रॉयल आणि सुंदर लुकने मीरा राजपूतने चाहत्यांची मन जिंकली. असा लुक तुम्ही परिधान केलात तर नक्कीच चारचौघात वेगळीच चमक असेल.

याशिवाय आलियाचा लेहेंगाही अनेकांचं लक्ष वेधून घेत होता. आता उन्हाळ्याचे दिवस आहे. अशावेळी फ्रेश वाटणारे रंग ट्राय करायला हरकत नाही. त्यामुळे समर वेडिंगसाठी तुम्ही पिवळा, गुलाबी असे भडक पण तितकेच फ्रेश रंग ट्राय करू शकता

View this post on Instagram

Eternal Sunshine 🌼

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

First Published on March 12, 2019 5:26 pm

Web Title: traditional look tips by bollywood celebrities