“बांधा”किंवा “इकत”या नावाने प्रसिध्द असलेली संबळपुरी साडी मूळची ओडिसाची आहे. चार मीटर ते नऊ मीटरपर्यंत मिळणारं हे कापड ओडिसातील महिला विविध प्रकारांनी नेसतात. संबळपुरी साडी पाचवारी पध्दतीने नेसली जाते. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींमुळे या साडीला खरी ओळख मिळाली आणि तेव्हापासून राजकारणातील स्त्रिया व राजकारण्यांच्या परिवारातील स्त्रियांच्या कपाटात या साडीला विशेष स्थान मिळाले.

विणकामाची वैशिष्ट्ये – 

cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Who is Landmark Group CEO Renuka Jagtiani
एकेकाळी होती कॅबचालकाची पत्नी, आज अब्जाधीशांच्या यादीत मिळवले स्थान; कोण आहे रेणुका जगतियानी?
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल

संबळपुरी साडी ही ओडिसातील मुख्यत: सोनेपुर, संबळपुर, बालंगीर या ठिकाणी विणली जाते. हातमागावर विणलेल्या या साडीची खासियत आहे “बांधकला”. यामध्ये धागे रंगाच्या पाण्यात ठेवले जातात. नंतर या रंगीत धाग्यांनी कापड विणले जाते. या विणकामाची खासियत म्हणजे विणल्यानंतर कापड दोन्ही बाजूंनी सारखेच दिसते. ही साडी कॉटन व सिल्क या दोन्ही प्रकारात मिळते. त्यामुळे ज्यांना कॉटनच्या साड्या वापरण्याची आवड आहे त्यांनाही उत्तम पर्याय उपलब्ध असतो.

कसे असते नक्षीकाम –

संबळपुरी साडीवर अजूनही पारंपारिक नक्षीकाम केले जाते. यामध्ये शंख, चक्र, फुले इत्यादींची नक्षी असते. हे विणकाम इतके सुबकतेने केलेले असते, की पहिल्यांदा पाहिल्यावर नक्षी छापली आहे असा भास होतो. विणकामाचे ठिकाण आणि नक्षीकाम यावरून साडीचे विविध प्रकार पडतात. जसे की, सोनेपुरी, पसपली, बोमकाइ, बापटा इ.

धागे रंगवून मग विणण्याच्या या पध्दतीमुळे संबळपुरी साडीचा रंग खूप वर्षे टिकून राह्तो. त्यामुळे घरच्या घरीच साबणाच्या पाण्यात धुतली तरी चालते. रंग जात नसल्यामुळे इतर हलक्या रंगाच्या साड्यांसोबत ठेवली तरी चालते. या साडीची किंमत पाचशे ते सहाशे रुपयांपासून सुरू होऊन काही हजार आणि अगदी लाखांपर्यतही जाते. कॉट्न व सिल्क धाग्यांच्या गुणवत्तेनुसार आणि नक्षीकामानुसार साडीची किंमत ठरवली जाते.

काळजी कशी घ्याल ?

इतर सिल्कच्या साड्यांप्रमाणेच या साड्या सुती कपडयामध्ये बांधून ठेवाव्यात. साडी हॅंगरला ठेवण्यापेक्षा अशी ठेवल्यास ती जास्त चांगली राहते. हल्ली साड्या नेसण्याचे प्रमाण कमी झाल्याने दिर्घकाळ साड्या वापरात येत नाहीत अशावेळी साडी पडून राहील्यास घडीला विरु शकते. त्यामुळे साड्यांच्या घड्या बदलून ठेवाव्यात. ही साडी थंड पाण्यात हलकीशी पावडर टाकून हाताने धुवावी किंवा ड्रायक्लीनला टाकावी. उन्हाने रंग फिका पडण्याची शक्यता असल्याने शक्यतो कोणत्याच साड्या उन्हात वाळवू नयेत.

वल्लरी गद्रे, फॅशन डिझायनर