मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी (MNP) आजपासून(दि.16) नवे नियम लागू होत आहेत. नव्या नियमांनुसार आता ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करण्यासाठी केवळ तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहेत. पण आता नवे नियम लागू झाल्यामुळे पोर्टिंग प्रक्रिया अधिक वेगवान गतीने तसेच आणखी सोपी होणार असल्याचं टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI)म्हटलं आहे.

आतापर्यंत मोबाइल क्रमांक दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी एका आठवडा ते 15 दिवसांचा कालावधी लागायचा. पण, नव्या नियमांनंतर केवळ तीन दिवसांचा वेळ लागेल. तर, एकाच सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी नवे नियम लागू झाल्यानंतर 5 दिवस लागणार आहेत. ट्रायच्या नवीन नियमानुसार विशिष्ट पोर्टिंग कोड (यूपीसी) प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी अटी घालण्यात आल्या आहेत. तीन दिवसांत मोबाइल नंबर पोर्ट करणे आवश्यक आहे. तसेच दुसऱ्या सर्कलमध्ये असलेल्या नंबरला पाच दिवसांत पूर्ण करावे लागणार आहे.
नव्या नियमांनुसार, पोस्टपेड मोबाइल कनेक्शन पोर्ट करण्याआधी ग्राहकाला आधीच्या नेटवर्क कंपनीच्या न भरलेल्या बिलाचा भरणा करणं आवश्यक असेल. तसंच, एखाद्या नेटवर्क कंपनीसोबत 90 दिवस सक्रिय राहिल्यानंतरच पोस्टपेड ग्राहक नव्याने नंबर पोर्ट करु शकतो. सर्व नियम व अटी पूर्ण करुनच दुसरी सेवा ग्राहकाला वापरता येणार आहे. यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळल्यास पोर्ट नंबर करताना समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.