प्रवासी आरोग्य
प्रवासाचा पुरेपूर आनंद लुटायचा तर अर्थातच आपले आरोग्य चांगले राहायला हवे. त्यासाठी प्रवासापूर्वी तसेच प्रवासात काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

मदन हातातल्या यादीप्रमाणे एक एक वस्तू सुटकेसमध्ये ठेवत होता. सकाळपासून तो याच कामात व्यग्र होता. दर वर्षी ट्रिपला निघण्यापूर्वी ही ‘अत्यावश्यक’ वस्तूंची यादी तयार करणे व त्यानुसार सुटकेस व्यवस्थित भरणे हे मदनचे अत्यंत आवडीचे काम. मदनच्या अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत ठळकपणे अर्थातच औषधे असतात. ताप, सर्दी, पडसे, खोकला, डोकेदुखी, अ‍ॅलर्जी, उलटी, जुलाब, अ‍ॅसिडिटी, अपचन, पोटदुखी, सांधेदुखी, गॅस अशा अनेक विकारांसाठी गोळ्या, खोकल्यावर कफसिरपची बाटली, विक्स, बाम, जखमेसाठी मलम, वेगवेगळ्या अँटिबायोटिक्सच्या कॅप्सूल वा गोळ्या, जखम धुण्यासाठी जंतुनाशक लोशन, वेगवेगळ्या मापाचे बॅण्डेज, बॅण्डएडच्या पट्टय़ा, कापूस, इंजेक्शनच्या सुया, इलास्टिक आणि क्रेप बॅण्डेज, नाकात टाकायचे ड्रॉप्स, डोळ्याचे ड्रॉप्स, कानाचे ड्रॉप्स, थर्मामीटर, टॉर्च, कात्री, इत्यादी अनेक गोष्टींचा मदनच्या यादीत समावेश असतो.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज

‘‘मदन, अरे तुझ्या पोतडीत एक दोन-चार सलाइनच्या बाटल्या व काही इन्जेक्शन टाकलीस ना की एक चक्क फिरते रुग्णालय तयार होईल बघ’’ नीता चेष्टेने म्हणाली. मदनला या टीकेची सवय होती. पण प्रवासात काय होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे सगळी सोय असलेली बरी या मताचा मदन होता.

प्रवासात जगातले सगळे आजार आपल्याच नशिबी येणार असा विचार करण्याची गरज नसते; परंतु मदनच्या अतिसावध स्वभावामुळे त्याला प्रवासाला निघताना ढीगभर औषधे बरोबर नेण्याची गरज भासते.

अनिलची पद्धत मात्र एकदम निराळी. अनिल बहुतेक वेळा प्रवास स्वत:च्या कारनेच करतो, त्यामुळे प्रवासाला जायची तारीख ठरली की सर्वप्रथम अनिल आपली कार गॅरेजमध्ये सव्‍‌र्हिसिंगला टाकतो. प्रवासाच्या १०-१५ दिवस आधी अनिल, त्याची बायको रूपा आणि मुलगी बेला आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे वार्षकि वैद्यकीय तपासणीसाठी जातात. काही वर्षांपूर्वी त्याला सहलीच्या काळात दाढदुखीचा प्रचंड त्रास झाला होता, तेव्हापासून तो दातांची तपासणीसुद्धा दर वर्षी प्रवासाला जाण्याआधीच करतो. गेली कित्येक वष्रे त्याचा हा परिपाठ सुरू आहे. फॅमिली डॉक्टरांनी सुचविलेल्या मोजक्याच औषधांची पिशवी ही त्याची प्रवासात उद्भवणाऱ्या वैद्यकीय अडचणींसाठी केलेली एकमेव तयारी.

अनिलच्या मते कारचे अन् शरीराचे सव्‍‌र्हिसिंग व्यवस्थित केल्यास प्रवासात काही अडचण येतच नाही. अनिलची ही पद्धत माझ्या मते सर्वोत्तम म्हणावी अशी आहे.

तब्येतीच्या किरकोळ तक्रारींमुळे सहलीच्या आनंदाला गालबोट लागू नये असे सर्वानाच वाटत असते व त्यामुळे त्या तक्रारीवरील इलाज आपल्याजवळ असावा असे वाटणेही साहजिकच आहे. परंतु औषध म्हणजे आरोग्य नव्हे. सहलीला जातांना औषधांच्या बॉक्सबरोबरच ‘ही औषधे वापरण्याची शक्यतो गरज पडू देणार नाही’ हा निर्धारही असावा. या निर्धारासाठी अर्थातच काळजी घ्यावी लागते.

प्रवासात आरोग्याच्या संदर्भात खालील प्रकारे त्रास होऊ शकतो.

१. आधीपासून असलेल्या रोगांतून वा विकारांतून उद्भवणारा त्रास
२. निष्काळजीपणामुळे किंवा प्रतिबंधक उपाययोजनेचा विचार न केल्यामुळे होणारा त्रास
३. अतिउत्साहाच्या भरात केलेले आणि अंगाशी आलेले साहस (म्हणजे आमंत्रित आजार)
४. आपल्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींमुळे उद्भवलेला त्रास, उदा. अपघात,प्रदूषण, वातावरणातील अचानक झालेले बदल, इत्यादी

प्रवासपूर्व तयारी :

आपण ज्या प्रांतात, प्रदेशात किंवा ज्या गावाला जाणार आहोत त्याबद्दलची माहिती आपण मिळवतोच, परंतु त्यात आरोग्यविषयक माहितीचा बरेचदा अभाव असतो.  उदा. ओरिसामध्ये जाताना आपण तिथल्या भौगोलिक परिस्थितीची माहिती  मिळवतो, तिथले हवामान तापमान कसे असेल याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो.  परंतु त्या भागात काही विशिष्ट आजार आढळतात का,  त्या संदर्भात काही प्रतिबंधक उपाययोजना करायला हवी का,  काय काळजी घ्यायला हवी याचा फारसा विचार केलेला आढळत नाही.  परदेशी मंडळी जेव्हा सहलीला निघतात तेव्हा या सर्व गोष्टींची माहिती मिळवत असतात आणि आपल्या डॉक्टरांशी याविषयी सल्लामसलतही करतात किंवा इंटरनेटची मदत घेतात.  आजकाल याविषयी इंटरनेटवर अफाट माहिती उपलब्ध आहे.

सहलीचे ठिकाण समुद्रसपाटीपासून किती उंच आहे हे माहीत असावे. २५०० ते ३००० मीटर्सपेक्षा उंचीवर प्राणवायूचे प्रमाण कमी असते. अचानकपणे जर ३५०० मीटर्स उंचीवर गेल्यास त्रास होऊ शकतो हे लक्षात ठेवायला पाहिजे. शक्यतो २००० ते २५०० मीटर्सवर एक-दोन दिवस मुक्काम करून मग पुढे जाणे जास्त योग्य.  जर हे काही कारणास्तव शक्य नसेल तर शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो हे लक्षात ठेवावे. अशा वेळी किरकोळ शारीरिक श्रमसुद्धा टाळावे. या वातावरणाचा हृदयविकार फुप्फुसाचे विकार वा पंडुरोगाच्या व अशक्त व्यक्तींना जास्त त्रास होतो. सहलीचे आयोजन करतानाच या सर्व गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असते.  प्रत्यक्ष प्रवास सुरू झाल्यानंतर या गोष्टी लक्षात येऊनही फारसा उपयोग नसतो. ज्यांना ट्रेकिंग करण्याची इच्छा असेल त्यांनी ट्रेकिंगसाठी आवश्यक शारीरिक क्षमता आधीच अजमावून पाहणे श्रेयस्कर.

वैद्यकीय तपासणी :

वार्षकि वैद्यकीय तपासणी हा प्रकार आपल्याकडे जवळजवळ अस्तितवात नाही असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. काहीही त्रास नसताना डॉक्टरांकडे जाणे खरंतर बहुतेकांना पटतच नाही. सहलीला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीचा उद्देश एवढाच की आपल्या नकळत आपल्या शरीरात एखादा ‘लक्षणविरहित विकार’ दडला तर नाही ना, याचा शोध घेणे आणि  असल्यास त्याबद्दल आपल्या डॉक्टरांकडून उपचार व मार्गदर्शन घेणे.

मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, मिरगी-आकडी यांसारख्या दीर्घ मुदतीच्या विकारांबद्दल आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडून सहलीला जाण्यापूर्वी पूर्ण तपासणी करून त्यांच्या सल्ल्याने औषधांची तजवीज करावी. ‘मला फारसा काही त्रास नाही’ किंवा ‘मला त्रासाची सवय आहे तुम्ही काळजी करू नका’ अशा प्रकारची आपल्याला असलेल्या विकाराबद्दल फाजील आत्मविश्वास किंवा बेफिकिरी दर्शवणारी विधाने लोक सरसकट करीत असतात. यासंबंधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे आपल्या विकाराबद्दलचे आपले विश्लेषण वा अंदाज फसवे असू शकतात. तेव्हा आपल्या डॉक्टरांना याविषयी बोलू द्या. काय करावे, काय टाळावे हे त्यांच्याकडून समजावून घ्या आणि त्यांच्या सल्ल्याने वागा. आपल्याला आधीपासून असलेला रोग आणि त्या विकारातून उद्भवणारा संभाव्य त्रास याविषयी डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केलीच पाहिजे.  आपल्याला असलेल्या विकाराची आवश्यक वैद्यकीय माहिती व औषधोपचारांचा तपशील तसेच आणीबाणीच्या परिस्थितीत घ्यायची काळजी किमान एवढय़ा गोष्टी एका डायरीत लिहून घ्याव्यात, तसेच आणीबाणीच्या परिस्थितीत काय उपाययोजना करावी यासंबधी एक संक्षिप्त टिपण सतत जवळ ठेवावे. ओळखपत्राच्या आकाराचे रोगाचे कार्ड करणे सर्वोत्तम. त्या कार्डात तुमचा फोटो, नाव, पत्ता, आणीबाणीच्या प्रसंगासाठी जवळच्या नातेवाईकांचा फोन नंबर व पत्ता, नेहमीच्या फॅमिली डॉक्टरांचा फोन नंबर व तातडीच्या उपाययोजनेबद्दलचे टिपण ठेवावे. रोगासंबधीचे कार्ड शक्यतो इंग्रजीत असावे, कारण परप्रांतात मराठी जाणणारा न मिळाल्यास कार्डाचा काहीच उपयोग होणार नाही.  अतिरक्तदाब, हृदयविकार, मधुमेह यांसारख्या विकारांमध्ये नियमित औषधोपचार अत्यावश्यक असतो. सहलीच्या कालावधीत पुरेल एवढा औषधांचा साठा जवळ असणे आवश्यक असते. मधुमेहासाठी इन्सुलिन घेत असल्यास इन्सुलिनचे इंजेक्शन आणि इंजेक्शनच्या सुया तसेच डिस्पोजल सििरज आपल्या जवळ बाळगाव्यात.  आपण जाऊ त्या गावात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळतीलच असे नाही त्यामुळे याबाबतीत जोखीम न घेतलेलीच बरी, अर्थात हे काही विशिष्ट औषधांच्या बाबतीतच खरे आहे. विरारला राहणारी मेधा गिरगावात आपल्या माहेरी येते तेव्हा आपल्या बाळाची तब्येत ठणठणीत असतानासुद्धा बाळाची खोकाभर औषधे येताना बरोबर आणते. असला वेडेपणाही टाळायला हवा. प्रवासात बरोबर ठेवायच्या औषधांची यादी करताना आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना साधारणपणे कुठल्या गोष्टींचा त्रास वारंवार होतो त्याचा विचार करायला हवा. त्यावरच्या उपाययोजनेबद्दल आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी आणीबाणीच्या परिस्थितीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने सॉर्बट्रिेट आणि अ‍ॅस्प्रिन गोळ्या सतत जवळ बाळगाव्यात. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी ग्लुकोज वा साखरेची पुडी सतत जवळ बाळगावी. विशेषत: मधुमेहासाठी इन्सुलिन घेत असल्यास हे अत्यावश्यक आहे.  शरीरातील साखरेचे प्रमाण अचानक कमी झाल्यास साखरेची पुडी जीवनरक्षकाचे काम करते.

डासांची समस्या आपल्या देशात सर्वत्र आहे, तेव्हा सहलीला कुठेही गेलात तरी डासांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी खबरदारी घ्यायलाच हवी. शरीराचा जास्तीतजास्त भाग झाकणारे कपडे वापरा. डासांपासून बचाव करणारे मलम वा तेल वापरा. मच्छरदाणीची सोय असेल तर सर्वोत्तम. डासांपासून मुख्यत्वेकरून मलेरिया व डेंगू हे दोन रोग होण्याची सर्वाधिक भीती असते. क्लोरोक्वीन, सल्फाडायजिन+ पायरिमिथामिन या गोळ्या मलेरिया प्रतिबंधक म्हणून वापरतात. फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने या संदर्भातला निर्णय घ्या. भारतात येणारी बरीचशी परदेशी मंडळी विशेषत: अमेरिका व इंग्लंडमधील पर्यटक नियमितपणे मलेरिया प्रतिबंधक गोळ्या घेतात. डासांपासून स्वत:चा बचाव हा सर्वोत्तम उपाय आहे. ज्या भागात मलेरियाचे प्रमाण जास्त आहे अशा प्रांतात जास्त काळजी घ्यायला हवी, उदा. ओरिसा प्रवासात. बऱ्याच लोकांना ट्रिपची मजा घ्यायची तर बिनधास्त वागणे आवश्यक आहे असे वाटत असते. बरेचदा ही मंडळी अतिकाळजी करणाऱ्या लोकांवर टीका करत असतात किंवा त्यांची थट्टा करतात.  बिनधास्तपणा म्हणजे ‘फिकीर नॉट’ पद्धतीने वागणे हे काही प्रमाणात आपल्या दैनंदिन चाकोरीतून बाहेर येण्यासाठी गरजेचं असतं, परंतु त्याला निष्काळजीपणाची झालर लागणार नाही याची काळजी घ्यावी.  आपल्या नेहमीच्या साचेबंद दैनंदिन आयुष्यातील तोचतोपणा घालवण्यासाठी आपण सहलीला जातो. सहलीच्या काळात आनंदी व उत्साही मन:स्थिती आणि नवीन सुंदर वातावरण हे मिश्रण आपल्याला संपूर्णपणे एका वेगव्व्याच सुखाचा अनुभव देते. आणि हे सुख अनुभवायचं तर आपली तब्येत चांगली असणे अत्यावश्यक असते

निष्काळजीपणामुळे प्रवासात आजारी पडलो तर तो कालावधी नेहमीच्या निरसपणापेक्षा कैकपट वाईट असणार हे कुणी सांगायला नको.

लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी :

प्रवासातच खाणेपिणे करावे लागते. अशा वेळी हात न धुता जेवणे निक्षून टाळावे. हात धुण्याचा महिमा सांगण्याची खरे तर गरज नाही. पोटाच्या कित्येक तक्रारी केवळ हात धुण्याची काळजी घेतल्यास टाळता येतात. प्रवासात थंड पेये, आईस्क्रीम तसेच वेगवेगळे चमचमीत पदार्थ विकणारे सतत आपल्याला मोहात पाडत असतात, विशेषत: लहान मुलांना. या पदार्थाच्या शुद्धतेविषयी आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळे ते टाळणे आवश्यक. आपण विकत घेतलेले खाण्यापिण्याचे पदार्थ, त्यांचा दर्जा आणि त्यांची गरज या गोष्टी पडताळून पाहाव्यात. या संदर्भात थोडेसे नियोजन फार उपयोगी पडते. शक्य असल्यास खाण्यापिण्याचे पदार्थ सोबत घेऊन जावेत. बरोबर आणलेल्या पदार्थाना पुरवणी हवी असल्यास फळे घ्यावीत. फळांची निवड करताना ज्या फळांना धुण्याची गरज नसते अशाच फळांची निवड करावी. अन्न आणि पाणी या बाबतीत काळजी न घेतल्यास अन्नविषबाधा, जुलाब, उलटय़ा, कावीळ, टायफॉइड असे अनेक विकार होऊ शकतात. दूषित अन्नपाण्यामुळे होणारा विकार अन्नसेवनानंतर २० मिनिटांपासून काही आठवडय़ांपर्यंत केव्हाही होऊ शकतो, जुलाब वा उलटय़ांचा त्रास झाल्यास जलसंजीवनी ही अत्यंत प्रभावी व जीवनरक्षक अशी उपाययोजना आहे. जलसंजीवनी तयार करण्याची पावडर बाजारात उपलब्ध आहे; परंतु तांब्याभर पाणी, मूठभर साखर अन् चिमूटभर मीठ हासुद्धा उत्तम पर्याय आहे.

पिण्यासाठी शक्यतो उकळलेले पाणी वापरावे. हॉटेलमध्ये विनंती केल्यास ही सोय होऊ शकते. पाणी शुद्ध करण्यासाठी गाळलेल्या पाण्यात क्लोरिनच्या गोळ्या वा ड्रॉप्सचा वापर हासुद्धा चांगला पर्याय आहे. उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यावे आणि त्याचबरोबर उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कॅप, रुमाल व गॉगलचा वापर करावा.

बस वा बोटीच्या प्रवासात मळमळणे आणि उलटय़ांचा त्रास बऱ्याच जणांना होतो. प्रवास सुरू होण्याच्या एक तास आधीच गोळी घेतल्यास त्रास होत नाही. आल्याचा स्वच्छ धुतलेला तुकडा तोंडात ठेवल्यास त्रास बराच कमी होतो.

समुद्रकिनारी सहलीला आलेली मंडळी समुद्रस्नानाबरोबरच पोहण्याचाही आनंद लुटत असतात; परंतु कधी कधी उत्साहाच्या भरात पोहण्यास मज्जाव असलेल्या किनाऱ्यावर आपले पोहण्याचे कसब अजमावण्याचा प्रयत्न करीत असतात. हे टाळायलाच हवे.

वॉटर पार्क आणि पोहण्याचे तलाव या ठिकाणी जिवाणूंच्या संक्रमणामुळे कान, डोके व पोटाचे विकार होऊ शकतात, याची जाणीव ठेवा.

सहलीच्या कालावधीत असो वा नंतर आजारपण हे वाईटच, तेव्हा काळजी घेणे आवश्यक आहे, त्याला पर्याय नाही. अर्थात काळजी घेऊनसुद्धा कधी कधी त्रास होऊ शकतो; परंतु काळजी न घेणाऱ्यांच्या तुलनेत त्याची शक्यता आणि तीव्रता नक्कीच कमी असते, याबद्दल वाद नाही.

थोडक्यात महत्त्वाचे

  • पिण्याचे पाणी सुरक्षित असावे.
  • ताजे व गरम, व्यवस्थित शिजलेले अन्न खा. आपण पर्यटनासाठी आलो आहोत, खाण्यासाठी नाही हे विसरू नका.
  • चटण्या, कोशिंबीर, सॅलड टाळावे.
  • संत्री, मोसंबी, केळी, किलगड, खरबूज, डाळिंब ही फळे खा.
  • परवडत असल्यास सुका मेवा खा
  • अनोळखी व्यक्तीकडून खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊ नका. सर्दी-पडसे झालेल्या सहप्रवाशापासून स्वत:चे रक्षण करा. िशकणे वा खोकल्यातून विषाणूंची फवारणी होते. त्यापासून स्वत:चा बचाव करा. नाकातील स्रावामुळे विषाणूंचे संक्रमण तेवढय़ाच प्रभावीपणे होते, हे लक्षात ठेवा व अशा व्यक्तीशी हात मिळवणे टाळा. हात जोडून नमस्कार करणे ही भारतीय पद्धत उत्तम.
  • कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी जास्तीचा चष्मा जवळ बाळगावा.
  • कॉन्ट्रॅक्ट लेन्स हरवल्यास पंचाइत होऊ शकते.
  • जेवणानंतर हात धुणे जेवढे आवश्यक त्याहीपेक्षा जेवणापूर्वी धुणे जास्त महत्त्वाचे व उपयुक्त.
  • क्लोरिनचे थेंब वा गोळ्या पाण्याचे र्निजतुकीकरण करण्यासाठी  वापराव्यात. पाणी उकळणे अर्थातच सर्वोत्तम. अर्थात बाटलीबंद पाण्याचा पर्याय असतोच म्हणा.
  • उन्हापासून स्वत:चे रक्षण करा. छत्री, टोपी, गॉगल वापरा.
  • उन्हाळयात भरपूर पाणी प्या. तहान भागवण्यासाठी शीतपेये टाळा.
  • तहान फक्त पाण्यानेच भागते हे आपण जाणतोच. त्याची आठवण ठेवा.
  • दुग्धजन्य पदार्थ, मिठाई आवर्जून टाळा.
  • अरबटचरबट, तेलकट वा तळलेले पदार्थ टाळा.
  • प्रवासात साधे जेवण घ्या. खाताना संयम पाळा. चार घास कमी खा. ‘अपचन’ हा सहलीच्या काळातील अविभाज्य भाग होऊ देऊ नका.

डॉ. राजेंद्र आगरकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा