15 December 2019

News Flash

Photo : पावसाळ्यात ‘या’ छत्र्यांचं कलेक्शन तुमच्याकडे हवंच!

पावसापासून रक्षण करण्यासाठी छत्री हे महत्वाचे साधन आहे

पावसाळा म्हटलं की हमखास आठवते ती म्हणजे छत्री, वेगवेगळ्या सॅण्डल्स आणि रेनकोटची.पावसापासून रक्षण करण्यासाठी छत्री हे महत्वाचे साधन आहे. त्यामुळे या छत्र्यांच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळतं. पावसामध्ये गरजेची असलेली छत्री सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या आकारात आणि स्टाईलमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये उलटी छत्री, मॅजिक छत्री आणि टेन्ट छत्री, चेरी ब्लॉसम छत्री या छत्र्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

१. चेरी ब्लॉसम छत्री –
२५० ते ५०० रुपयेपर्यंत मिळणाऱ्या या छत्र्या सध्या ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहेत. तरुणींमध्ये या छत्रीची विशेष क्रेझ आहे. ट्रान्सपरंट असलेल्या या छत्रीच्या मध्यभागावर लहान लहान फुलांची डिझाइन करण्यात आली आहे. ही छत्री सध्या ट्रेण्डमध्ये असून तिची खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

२. सी ग्रीन रंगाची छत्री –
या रंगाच्या छत्रीला ग्राहकांमध्ये विशेष मागणी आहे. या छत्रीमध्ये अॅक्वा ग्रीन कलर जास्त आढळून येत आहे. यात छत्रीवर समुद्र, समुद्र किनारा आणि किनाऱ्यावर काही निसर्ग रेखाटण्यात आला आहे. त्यामुळे ही छत्री पुरुष आणि स्त्री दोघेही वापरु शकतात.

३. पोल्का डॉट्स-
पोल्का डॉट्स छत्री ही एव्हरग्रीन म्हणून ओळखली जाते. ट्रेण्ड कितीही बदलला तरी बाजारात या छत्रीची मागणी कमी होत नाही. प्लेन छत्रीवर विविध रंगांचे किंवा एका ठरावी रंगाचे डॉट्स दिलेले असतात.

४. प्लेन रंगाची छत्री –
उन्हाळा किंवा पावसाळा अशा कोणत्याही ऋतूमध्ये सहज वापरता येईल अशी ही छत्री आहे. एकाच रंगाचं कापड वापरुन ही छत्री तयार करण्यात येते. या छत्रीची किंमत २५०पासून सुरु होते. यात विविध रंग उपलब्ध असतात.

५.डिजिटल प्रिंट –
बदलत्या काळानुसार छत्र्यांच्या प्रिंटमध्येही बदल होत आहेत. सध्या बाजारात डिजिटल प्रिंटच्या छत्र्यांची चलती आहे. वेगवेगळे मेसेज, किंवा चित्र या छत्रीवर रेखाटण्यात येतात. तरुण वर्गामधून या छत्रीला जास्त पसंती देण्यात येत आहे.

६. रिव्हर्स डबल लेअर छत्री-
सध्या तरुणींकडे ही छत्री जास्त पाहायला मिळत आहे.  या छत्रीमध्ये दोन रंगाचं कापड वापरण्यात येतं. त्यासोबतच या छत्रीचं हॅण्डलही हटके असतं.

 

First Published on July 16, 2019 2:30 pm

Web Title: trendy umbrellas under rs 1000 ssj 93
Just Now!
X