News Flash

नेहमीच्या पीठाशिवाय रताळे घालून बनवा केकची ‘ही’ रेसिपी!

न्यूट्रिशनिस्ट पूजा माखीजाने या मग केकची रेसिपी शेअर केली आहे. त्यांच्या मते ही रेसिपी आरोग्यासाठी उत्तम तसेच चवदारही आहे.

mug cake
पटकन होणारी ही केकची रेसिपी नक्की ट्राय करा!

जर तुम्हाला काही तरी गोड खायची इच्छा आहे. पण ते गोड शरीराला फायद्याच ठराव असही वाटत असेलं तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. न्यूट्रिशनिस्ट पूजा माखीजा यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून नुकतीच एका मग केकची रेसिपी शेअर केली आहे. हा केक खायला जेवढा चवदार आहे तेवढीच सोप्पी याची रेसिपी आहे. या रेसिपीची खासियत म्हणजे यात नेहमी वापरले जाणारे पीठ किंवा दुग्धजन्य पदार्थ नाहीत. तसेच या रेसिपीमध्ये चक्क गोड बटाटा अर्थात रताळे वापरले आहे. जर तुम्ही कोणाला या केकमध्ये काय साहित्य वापरले आहे हे सांगितले नाही तर कोणीच यात नक्की कोणते साहित्य वापरले आहेत हे सांगू शकत नाही असं पूजा माखीजा सांगतात.

साहित्य

२ टेबल स्पून – कोको पावडर
२ टेबल स्पून – बदाम पीठ
१/४ टीस्पून – बेकिंग पावडर
१/४ टीस्पून – मीठ
१ टीस्पून – बदामाचे बटर
२ टीस्पून – मॅपल सिरप
१- मध्यम आकाराचा उकडलेले रताळे
२ टेबल स्पून – नारळाचे दही
चॉकलेट चीप – आवडीनुसार

 

View this post on Instagram

 

A post shared by PM | Nutritionist (@poojamakhija)

कृती

१. एक मोठ्या आकाराचा कॉफी मग घ्या. त्यात कोको पावडर, बदाम पीठ, बेकिंग पावडर, मीठ, बदाम बटर आणि मॅपल सिरप घाला.
२. त्या मिश्रणात एक मध्यम आकाराचा उकडलेले रताळे घाला आणि व्यवस्थित मॅश करा.
३. पुढे मिश्रणात नारळाचे दही घालून मिक्स करा.
४. मिश्रणात वरून चॉकलेट चीप घाला.
५. ३ मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह करा आणि मस्त गरम गरम ते सर्व्ह करण्यास तयार आहे मग केक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2021 11:49 am

Web Title: try this flour less mug cake recipe shared by nutritionist pooja makhija ttg 97
Next Stories
1 अवांतर आरोग्य : आयुर्वेदिक औषधांचे दुष्परिणाम
2 का घडते असे… अघटित?
3 मनोमनी : झोप
Just Now!
X