‘मला रात्री अजिबात झोप येत नाही’ ही किमान १० पैकी सहा जणांची तक्रार असतेच. रात्री पडल्या पडल्या झोप लागणारी माणसे नशिबवानच म्हणावी लागलीत. धावपळीचे आयुष्य, बिघडलेली कामाची वेळ, अवेळी खाणे पिणे, ताण-तणाव यासांरख्या अनेक गोष्टी या निद्रानाशेसाठी कारणीभूत ठरतात. मग चिडचिड होणे आणि आरोग्याच्या इतर समस्याने आपण कधी ग्रासले जातो हे कळतच नाही. किमान आठ तासांची झोप ही आवश्यक आहे पण बदलत्या जीवनशैलीमुळे चार तासही धड झोप लागत नाही. म्हणूनच लवकर झोप येण्यासाठी तुम्ही ट्रीक करून पाहू शकता.

वाचा : रात्री ‘हे’ पदार्थ खाणे आवर्जुन टाळा

पडल्या पडल्या झोप लागण्यासाठी ‘४-७-८ श्वासोच्छवास’ टेक्निक नक्की करून पहा. ही पद्धत नक्कीच फायदेशीर ठरू शकते असा दावा करण्यात आला आहे. डॉक्टर अॅड्र्यू वेल यांनी ही पद्धत शोधून काढली आहे. ज्यांना अंथरूणावर पडल्या पडल्या झोप येत नाही त्यांनी ‘४-७-८’ चा प्रयोग करून पाहिला तर त्यांना लगेच झोप येऊ शकते असा दावा त्यांनी केला आहे.
काय आहे ‘४-७-८’ पद्धत
४ सेकंद दिर्घ श्वास घ्या.
७ सेकंद हा श्वास रोखून धरा
आणि आठव्या सेकंदाला श्वास सोडा.
तीन वेळा हीच प्रक्रिया करा. यामुळे काही काळ मनावरचा तणाव हलका होतो. या प्रक्रियेची सवय एकदा लागली की मन शांत व्हायला आणि मनावर ताबा मिळवणे ही सोप जातं त्यामुळे डॉक्टर अॅड्र्यूच्या मते अंथरुणार पडल्या पडल्या झोप येण्यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरु शकते.

 वाचा : जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे