News Flash

टॉप स्पीड 310, TVS ची नवीन Apache झाली लाँच

ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी : क्लच न दाबताही चालवू शकता बाइक

(छाया सौजन्य - टीव्हीएस)

TVS ने आपली फ्लॅगशिप मोटरसायकल TVS Apache RR 310 चे बीएस-6 मॉडेल लाँच केले आहे. नवी Apache रेड एक्सेंट्ससह ब्लॅक आणि ग्रे या नव्या ड्युअल-टोन कलरमध्ये आली आहे. तसेच बाइकवर नवे ग्राफिक्स दिल्यामुळे बाइकचा स्पोर्टी लुक अधिक शानदार दिसतोय. या बाइकचा टॉप स्पीड 310 असून 0 ते 60 किलोमीटर प्रतितास इतका वेग पकडण्यासाठी गाडीला केवळ 2.9 सेकंदांचा वेळ लागतो असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय बाइकमध्ये ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी प्लस फीचरचा समावेश करण्यात आला आहे, हे फीचर पहिल्या आणि दूसऱ्या गिअरवर काम करतं. या फीचरने स्लो स्पीडमध्ये क्लच न दाबता बाइक चालवू शकतात. यामुळे रायडरला थकवा जाणवत नाही, असं कंपनीचं म्हणणं आहे.

नवीन इंस्ट्रूमेंट कन्सोल –
बीएस-6 इंजिनशिवाय बाइकमध्ये सर्वात मोठा बदल इंस्ट्रूमेंट कन्सोलमध्ये झाला आहे. अपडेटेड बाइकमध्ये ब्लूटूथसह नवीन 5-इंच कलर टीएफटी इंस्ट्रुमेंट पॅनल आहे. तुम्ही स्क्रीन स्मार्टफोनसोबत कनेक्ट करु शकतात आणि टीव्हीएस कनेक्ट अॅपच्या माध्यमातून अनेक फंक्शन्स ऑपरेट करु शकता. या स्क्रीनमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन पाहू शकतात. तुमच्या फोनवर जर कॉल येत असेल तर कॉल करणाऱ्याचे सर्व डिटेल्स यामध्ये दिसतील. फोन रिसीव्ह किंवा रिजेक्ट करण्याची सुविधाही यामध्ये मिळेल. नव्या इंस्ट्रुमेंट कन्सोलमध्ये व्हेइकल हेल्थ अलर्ट (फ्युअल लेवल, सर्व्हिस ड्यू आणि एबीएस मॅलफंक्शन) आणि मोबाइल फोन स्टेटस (बॅटरी लेवल आणि नेटवर्क) डिस्प्लेवर दिसते. स्क्रीनमध्ये एक सेंसर असून याद्वारे अॅम्बिअँट लायटिंगनुसार दिवस आणि रात्रीच्या सेटिंग्स ऑटोमॅटिक अॅडजस्ट होतात.

ट्रॅफिकमध्ये रायडिंग सोपी-
टीव्हीएसने बीएस6 Apache मध्ये चार रायडिंग मोडसोबत (रेन, अर्बन, स्पोर्ट आणि ट्रॅक) राइड -बाय-वायर टेक्नॉलॉजी दिली आहे. मोडच्या आधारे इंजिनची पावर, थ्रॉटल रिस्पॉन्स आणि एबीएसच्या सेटिंग्स बदलता येतात. तसेच इंस्ट्रुमेंट पॅनलच्या डिस्प्लेची थीमदेखील बदलते. बाइकमध्ये ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी प्लस फीचरचा समावेश करण्यात आला आहे, हे फीचर पहिल्या आणि दूसऱ्या गिअरवर काम करतं. या फीचरने स्लो स्पीडमध्ये क्लच न दाबता बाइक चालवू शकतात. यामुळे रायडरला थकवा जाणवत नाही.

आणखी वाचा – कशी आहे KTM ची Adventure? जाणून घ्या किंमत आणि खासियत

इंजिन –
अपडेटेड बाइकमध्ये बीएस-6 , 312.2cc इंजिन आहे. हे इंजिन 9,700rpm वर 34hp ची ऊर्जा आणि 7,700rpm वर 27.3Nm टॉर्क निर्माण करते. इंजिनमध्ये स्पिलर क्लचसह 6-स्पीड ट्रांसमिशन आहे. या बाइकचा टॉप स्पीड 310 असून 0 ते 60 किलोमीटर प्रतितास इतका वेग पकडण्यासाठी गाडीला केवळ 2.9 सेकंदांचा वेळ लागतो असा कंपनीचा दावा आहे.

आणखी वाचा – ‘कावासाकी’ची नवीन Ninja लाँच, होंडाच्या CBR650F ला टक्कर

कॉस्मेटिक अपडेट-
नवी Apache रेड एक्सेंट्ससह ब्लॅक आणि ग्रे या नव्या ड्युअल-टोन कलरमध्ये आली आहे. तसेच बाइकवर नवे ग्राफिक्स दिल्यामुळे बाइकचा स्पोर्टी लुक अधिक शानदार दिसतो. याशिवाय बाइकचे डायमेंशन्स, ड्युअल प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प आणि सीट्स पहिल्याप्रमाणेच आहेत.

किंमत –
TVS Apache RR 310 BS6 ची किंमत 2.40 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बीएस4 मॉडेलच्या तुलनेत या बाइकची किंमत 12 हजार रुपयांनी वाढलीये. टीव्हीएसने ही बाइक बीएस-6 मध्ये अपडेट करण्याव्यतिरिक्त काही कॉस्मेटिक बदल केलेत. याशिवाय अनेक नवे फीचर्सचा समावेश केलाय.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:15 pm

Web Title: tvs apache rr310 bs vi launched in india know price specifications and all other details sas 89
Next Stories
1 हा आहे जगातील सर्वात महाग आयफोन; किंमत वाचून व्हाल हैराण
2 Honda ची नवीन Amaze लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत
3 दररोज 5जीबीपर्यंत डेटा , BSNL चा खास प्लॅन
Just Now!
X