‘मायक्रो-ब्लॉगींग’ वेबसाइट ट्विटरने आपल्या डिझायनमध्ये पाच अपडेट केले आहेत. अतिशय कमी शब्दात आपले म्हणणे मांडणे आपल्या बद्दल अपडेट करणे, ही ट्विटरची खाशीयत आहे. याच ट्विटरने पाच नवीन डिझायन लाँच केली आहेत. गेल्या काही महिन्यापासून याबद्दल चर्चा सुरू होती आणि आज अखेर ट्विटरमध्ये हे बदल पहायला मिळत आहेत.

ट्विटरचा नवीन लूक पहिल्यापेक्षा दर्जेदार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. नव्या डिझायनमध्ये आवडीनुसार थीमचा रंग निवडू शकतो. नव्या अपडेटने ट्विटरचा लूक पुर्णपणे बदलला आहे.

ट्विटरला जलद, दर्जेदार आणि सोपं करण्यासाठी कंपनीकडून अनेक बदल करण्यात आले आहेत. ट्विटरच्या डेक्सटॉप व्हर्जनमध्येही हे बदल करण्यात आले आहेत.

मोबाईल अॅपमधील अनेक फिचर्स डेक्सटॉप व्हर्जनमध्ये उपलब्ध झाले आहेत. ट्विटरच्या या नव्या अपडेटमध्ये ‘कस्टमायझेशन ऑप्शन्स’ वाढवण्यात आलेत. शिवाय, ट्विटरवर नेव्हिगेशन सेटिंग्स बदलल्यामुळे त्याचा लुक बदलल्याचं समजतं. लवकरच हे अपडेट सर्व यूजर्ससाठी उपलब्ध केलं जाईल.

कालांतराने ट्विटर मायक्रो-ब्लॉगींगवरच मर्यादीत न राहता एक सोशल मेसेजींग टुल झाले आहे. आपण ट्विटर वापरुन सर्वांपर्यंत एकच संदेश एकाच वेळी पोहचवू शकता. ‘फॉलोअर्स’ आणि ‘फॉलो’ यामुळे ट्विटर हे एक मित्रांचे जाळे म्हणून सुद्धा वापरु शकतो.

ट्विटरच्या या नव्या बदलावर नेटकऱ्यांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांना ट्विटरचे हे नवं अपडेट आवडले आहे. तर काही जणांनी यावर टीका केली आहे. #TwitterDesign हा ट्रेंड सध्या ट्विटरवर सुरू आहे.