News Flash

‘ट्विटर लाइट’ अॅप भारतात लॉन्च, खराब नेटवर्कमध्येही भन्नाट चालणार

भारतात इंटरनेटच्या कमी स्पीडमुळे अनेक युजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो यासाठीच ट्विटर लाइट हे अॅप लॉन्च

(संग्रहित छायाचित्र)

मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफार्म ट्विटरने भारतीय युजर्ससाठी ट्विटर लाइट अॅप लॉन्च केलं आहे. भारतासह २१ अन्य देशांमध्ये कंपनीने हे अॅप सादर केलं आहे. इंटरनेटचा स्पीड कमी असतानाही या अॅपद्वारे ट्विटरचा सुलभपणे वापर करता येणार आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कंपनीने लाइट अॅप सादर करणार असल्याची घोषणा केली होती. सध्या केवळ अॅन्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी हे अॅप सुरु करण्यात आलं आहे. भारतात इंटरनेटच्या कमी स्पीडमुळे अनेक युजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो यासाठीच ट्विटर लाइट हे अॅप लॉन्च करत असल्याचं कंपनीने सांगितलं. केवळ 3 एमबीच्या या अॅपमुळे डेटा आणि स्पेस दोन्हींची बचत होणार आहे. 2G आणि 3G नेटवर्क लक्षात घेऊन कंपनीने या अॅपची निर्मिती केली आहे.

यामध्ये ‘डेटा सेव्हर मोड’चा पर्यायही देण्यात आला असून याद्वारे युजरला कोणते फोटो किंवा व्हिडीओ हवे आहेत तेवढेच ओपन होतील आणि अन्य फोटो किंवा व्हिडीओ ‘ब्लर’ होतील. यापूर्वी, कमी इंटरनेटमुळे होणाऱ्या अडचणींमुळे फेसबुकने मोबाइल अॅपची लाइट आवृत्ती सादर केली आहे,तर स्काइप आणि लिंक्ड-इन यांनी अशाप्रकारची आवृत्ती सादर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 4:41 pm

Web Title: twitter lite app launched in india
Next Stories
1 आजपासून Amazon Prime ला Flipkart Plus ची टक्कर, काय होणार फायदा?
2 Video : दोस्त असावा तर असा, श्वानाने वाचवले चिमुरडीचे प्राण
3 1322 कोटींची लॉटरी जिंकताच पतीला सोडून चोराशी केलं लग्न !
Just Now!
X