29 September 2020

News Flash

ट्विट कॉपी पेस्ट करताय? मग हे वाचाच; ट्विटरने घेतला मोठा निर्णय

जाणून घ्या काय आहे निर्णय, कंपनीने ट्विट करत दिली माहिती

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

मायक्रोब्लॉगिंग साईट अशी ओळख असणाऱ्या ट्विटरने एका मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विविध पक्ष व संस्थांसाठी काम करणाऱ्या आयटी सेलची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे. ट्विटरने कॉपी पेस्ट होणारे ट्विट हाइड करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे, जर तुम्ही कोणाचे ट्विट कॉपी करून ते पेस्ट करत असाल किंवा एकच ट्विट अनेकजण करत असतील, तर ते ट्विट लोकांच्या टाइमलाइनवरून हाइड केले जाणार आहेत.

ट्विटरकडून या संदर्भात ट्विट करून सविस्तर माहितीही देण्यात आली आहे. ट्विटरकडून सांगण्यात आले आहे की, मागील काही वर्षांमध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कॉपी-पेस्ट ‘copypasta’ वाल्या ट्वटिच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकाच ट्विटला अनेकजण कॉपी करून ट्विट करत आहेत. अशावेळी आम्ही अशा ट्विटची व्हिजिबिलीटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Next Stories
1 ओठांच्या सौंदर्यासाठी वापरा ‘या’ चार टीप्स
2 उपाशी पोटी प्या कोमट पाणी, मिळतील हे पाच फायदे
3 एखाद्या महामारीपेक्षा कमी नाही चिकनगुनियाचा आजार; जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपाय
Just Now!
X