लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर लवकरच केलेले ट्विट एडिट करण्याचा पर्याय येण्याची शक्यता आहे. यासाठी कंपनी एक नवं फीचर लाँच करणार असल्याचं वृत्त आहे. पण, या फीचरद्वारे तुमचं आधीचं(ओरीजिनल ट्विट) ट्विट देखील इतरांना दिसेल, त्याचसोबत नव्याने एडिट केलेलं ट्विट देखील असेल.

शनिवारी एका मुलाखतीदरम्यान, ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विट एडिट करण्यासाठी एक 5 ते 30 सेकंदांचं डिले फिचर आणलं जाऊ शकतं. आतापर्यंत हे फीचर का नव्हतं या प्रश्नावर उत्तर देताना डोर्से म्हणाले, ट्विटरची निर्मीती SMS म्हणजेच मेसेजच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. एकदा मेसेज पाठवल्यानंतर तो डिलीट करता येत नाही, त्याप्रमाणे एकदा ट्विट केल्यानंतर ते ट्विट जगभरात जातं असं ते म्हणाले. पण, लवकरच ट्विट एडिट करण्यासाठी एक 5 ते 30 सेकंदांचं डिले फिचर आणलं जाऊ शकतं अशी माहितीही त्यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून असं फीचर उपलब्ध करून द्या अशी मागणी मोठ्या प्रमाणात युजर्सकडून केली जात आहे असंही त्यांनी सांगितलं.