माइक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या युजर्सच्या सोयीसाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. ट्विटरवर ट्रोलिंगमुळे त्रस्त झालेल्यांसाठी हे फीचर काही प्रमाणात फायद्याचं ठरणार आहे. या फीचरद्वारे युजरला आपलं अकाउंट कंट्रोल करता येणार आहे. म्हणजे, कोणी आपल्या ट्विटवर प्रतिक्रिया द्यावी किंवा नाही हे ट्विट करणाऱ्या युजरलाच ठरवता येणार आहे.

आतापर्यंत ट्विटरवर एखाद्या पब्लिक ट्विटवर कोणालाही रिप्लाय देता यायचा, पण आता नवीन फीचरमुळे रिप्लायसाठी ‘लिमिट’ सेट करण्याचा पर्याय आला आहे. कोणी रिप्लाय द्यायचा किंवा नाही हे तुम्हाला ठरवता येणार आहे. जे युजर्स रिप्लाय देऊ शकणार नाहीत, ते आधीप्रमाणेच तुमच्या ट्विटला लाइक, शेअर रिट्विट किंवा कमेंट करुन रिट्विट करु शकतील.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

कसं वापरायचं ?
-सर्वप्रथम तुमच्या फोन किंवा डेस्कटॉपवर Twitter ओपन करा.
-आता नवीन ट्विट क्रिएट करा आणि खाली दिलेल्या ग्लोब आइकॉनवर टॅप करा.
-नंतर तुम्हाला तीन पर्याय- Everyone, People you follow आणि Only the people you mention दिसतील.
-Everyone हा पर्याय सिलेक्ट केल्यास सर्वांना रिप्लाय करता येईल.
-People you follow सिलेक्ट केल्यास तुम्ही ज्यांना फॉलो करतात ते युजर्स रिप्लाय करु शकतील. किंवा
-Only the people you mention हा पर्याय निवडल्यास ज्यांना ट्विटमध्ये तुम्ही मेन्शन केलं आहे ते युजर रिप्लाय करु शकतील.
-एकदा ट्विट झाल्यानंतर सेटिंग्समध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे ट्विट करण्याआधीच योग्य पर्याय निवडल्याची खात्री करा. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे पर्याय निवडू शकतात.