13 July 2020

News Flash

‘ही’ अकाऊंट्स होणार बंद; ट्विटरचा इशारा

बंद केलेल्या अकाऊंट्सचे युजर नेम दुसऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

सहा महिन्यांहून अधिक काळ न वापरलेले ट्विटर अकाऊंट्स बंद करण्याचा इशारा ‘ट्विटर’कडून देण्यात आला आहे. ही कारवाई सहा महिन्यांपासून साइन इन न केलेल्या अकाऊंट्सवरही होणार आहे. युजर्सनी ११ डिसेंबरपर्यंत अकाऊंट साइन इन न केल्यास ते कायमचे बंद केले जाईल. हे अकाऊंट बंद होण्याआधी युजरला ‘ट्विटर अलर्ट’ पाठवला जाईल. त्यानंतरही साइन इन न केल्यास किंवा अकाऊंट न वापरल्यास युजरचा ट्विटर अकाऊंट कायमचा बंद करण्यात येईल.

अॅक्टिव्ह नसलेल्या युजर्सचे अकाऊंट बंद करण्याचे काम सुरू आहे. यामुळे इतर युजर्सना चांगली सेवा मिळू शकेल आणि त्यांचा ट्विटरवरील विश्वास वाढेल, असं ट्विटरच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे अकाऊंट्स बंद करण्याची प्रक्रिया फक्त एका दिवसात नाही तर काही महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असंदेखील त्यांनी म्हटलंय.

बंद केलेल्या ट्विटर अकाऊंटचे ‘युजर नेम’ दुसऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आपले अकाऊंट सक्रिय आहे हे दाखवण्यासाठी युजरला कोणतेही नवीन ट्विट करण्याचे गरजेचे नाही. युजर्सना फक्त लॉग इन करून ट्विटरच्या काही सूचनांचं पालन करावं लागणार आहे.

ट्विटरने अॅक्टिव्ह नसलेल्या युजर्सना इशारा देण्यासाठी ई-मेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अकाऊंट बंद करण्याची तारीख ११ डिसेंबर २०१९ पासून देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 5:04 pm

Web Title: twitter to remove accounts inactive for over 6 months ssv 92
Next Stories
1 पालक खाण्याचे ‘हे’ फायदे ऐकाल, तर आजपासून आहारात कराल समावेश
2 हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला का होतो आणि त्यावर उपाय काय?
3 थंडीमध्ये ‘या’ चार गोष्टी खाल्ल्याने होईल फायदा
Just Now!
X