03 March 2021

News Flash

Twitter मध्ये आलं Voice DM फिचर, आता तुमचा आवाज रेकॉर्ड करुन पाठवा मेसेज

ट्विटरमध्ये आलं खास फिचर...

(File Photo: Reuters)

लोकप्रिय माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Twitter ने आपल्या युजर्ससाठी बुधवारी एक खास फिचर जारी केलं. कंपनीने व्हॉइस डायरेक्ट मेसेज (Voice DM) नावाचं फिचर आणलं असून भारत, जपान आणि ब्राझिल या देशांमध्ये हे फिचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. या फिचरद्वारे युजर्स स्वतःचा आवाज रेकॉर्ड करुन मेसेज पाठवू शकतात.

व्हॉइस ट्विटप्रमाणेच व्हॉइस मेसेजमध्येही 140 सेकंदांची ऑडिओ नोट पाठवता येते. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी आहे. ट्विटर अ‍ॅप अपडेट केल्यानंतर डायरेक्ट मेसेजच्या बॉक्समध्ये व्हॉइस रेकॉर्डिंगचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करुन तुम्हाला जो मेसेज पाठवयाचा असेल तो बोलून रेकॉर्ड आणि सेंड करता येतो. मेसेज पाठवण्याआधी तुम्ही तो ऐकूही शकतात.

(व्हिडिओ सेंड करण्याआधी Mute आणि Edit करता येणार, WhatsApp चं नवीन फिचर)

“भारत आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे, त्यामुळे आम्ही आमचे नवीन फिचर्स सातत्याने भारतात रोलआउट करत आहोत. व्हॉइस मेसेजद्वारे कोट्यवधी युजर्सना एक वेगळा अनुभव मिळेल”, असं ट्विटर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनीष महेश्वरी यांनी म्हटलं.

Twitter गेल्या वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा व्हॉइस ट्विट फिचर जारी केलं होतं, त्यानंतर आता व्हॉइस मेसेजिंग फिचर रोलआउट करण्यास सुरूवात झाली आहे. लवकरच सर्व युजर्सपर्यंत हे नवं फिचर पोहोचण्याची शक्यता आहे.

(Clubhouse प्रमाणेच ट्विटरचं भारतात नवं फिचर Spaces ; जाणून घ्या खासियत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 11:51 am

Web Title: twitter voice dms feature being rolled out in india also in brazil and japan check details sas 89
Next Stories
1 पाच कॅमेऱ्याच्या Nokia 5.4 चा पहिल्यांदाच ‘सेल’, किंमत १५ हजारांपेक्षाही कमी
2 बाल मनोविकार
3 सौंदर्यभान : बॉडी कॉन्टूरिंग ट्रीटमेंट
Just Now!
X