19 October 2020

News Flash

Twitter लवकरच बंद करणार Retweets पर्याय?

नको असलेल्या कन्व्हर्सेशनमधून युजर्सची होणार सुटका

सोशल मीडियामधील सर्वाधिक प्रभावी माध्यमांपैकी एक असलेल्या ट्विटरमध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. कंपनी पुढील वर्षापासून ट्विट आणि रिट्विटच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या विचारात आहे. ट्विटरचे उपाध्यक्ष डेंटली डेव्हिस (डिझाइन अँड रिसर्च ) यांनी याबाबत माहिती दिली आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर लवकरच एक छळवणूक विरोधी फीचर (Anti-Harassment Features) युजर्सच्या सेवेत दाखल करण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा- Twitter च्या सीईओंनी ‘या’ तीन शब्दांमध्ये उडवली Facebook च्या नव्या ‘लोगो’ची खिल्ली

आणखी वाचा- Twitter वर राजकीय जाहिरातींना बंदी, CEO जॅक डॉर्सी यांनी केली घोषणा

डेंटली डेव्हिस यांनी २०२० मध्ये ज्या फीचर्समध्ये बदल किंवा जे नवे फीचर्स आणायचा विचार आहे, अशी एक यादी शेअर केली आहे. तसंच, त्यांनी युजर्सकडून शिफारसी देखील मागवल्या आहेत. यानुसार, युजरला चांगला अनुभव मिळावा यासाठी युजरच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही त्यांच्या संवादाचा भाग बनू शकणार नाहीत. युजर्स लवकरच स्वत: ठरवू शकतात की इतर युजर्स त्यांचे ट्विट रिट्वीट करु शकतात किंवा नाही, किंवा एखाद्या खास ट्विटला रिट्विट करण्याचा पर्याय बंद करणे. याशिवाय परवानगीशिवाय मेंन्शन करता न येणे, अशाप्रकारच्या फीचरबाबत कंपनी विचार करतेय. हे फिचर लाँच झाल्यावर ट्विटरवर रिट्विट आणि दुसऱ्या युजर्सना मेंन्शन करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली जाणार आहे. या फीचरनंचर कोणत्याही कन्व्हर्सेशनमध्ये युजरच्या परवानगीशिवाय कोणीही त्यांना सामील करु शकणार नाही.

यापूर्वीच ट्विटरने राजकीय जाहिराती ट्विटरवरुन बंद करण्याची घोषणा केली आहे. 22 नोव्हेंबर पासून ट्विटरवर राजकीय जाहिराती दिसणार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 9:34 am

Web Title: twitter vp shares the upcoming features of the platform in 2020 retweet options may be changed sas 89
Next Stories
1 Twitter च्या सीईओंनी ‘या’ तीन शब्दांमध्ये उडवली Facebook च्या नव्या ‘लोगो’ची खिल्ली
2 विराटला शुभेच्छा देताना पंत म्हणाला, ओ काका ! नेटकरी म्हणतात मस्का मारतोयस का?
3 फेसबुक, ट्विटर, लिंक्डइनसह अनेक सोशल मीडिया अ‍ॅप्सचा रंग निळाच का?
Just Now!
X