गेल्या काही वर्षातील सोशल मीडियातील सर्वात लोकप्रिय समाजमाध्यमं म्हणजे ट्विटरला ओळखलं जाते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ट्विटर आपल्या युजर्सला नेहमी नवीन अपडेट देत असते. आता ट्विटरने पोस्ट शेड्यूल करता येणारं नवीन फिचर आणलेय. कंपनीने याआधीही अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. नवनव्या फिचर्समुळे ट्विट करणे आधिक सोयीस्कर झालेय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेट स्पीच आणि ट्रोलिंगला थांबवण्यासाठी ट्विटरने नवीन फीचरते टेस्टिंग सुरू केलं आहे. काही मोजक्या डेस्कटॉप यूजर्संना सध्या हे फिचरचे अपडेट मिळालं आहे. लवकर कंपनी इतर वापरकर्त्यांनाही हे फिचर देण्याची शक्यता आहे.

त्याशिवाय ट्विटर आणखी एक नवीन फिचर घेऊन येण्याच्या तयारीत असून त्यावर सध्या काम सुरू आहे. युझर्संना पोस्ट करण्यापूर्वी कन्टेटमध्ये बदल करता येणार आहे. या नव्या फिचरमुळे आपत्तीजनक कन्टेटवर आळा बसेल असं मत कंपनीने व्यक्त केलं आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार हे तिन्हीही फिचर सर्वात आधी IOS यूजर्सला उपलबद्द होणार आहे.