Xiaomi Mi True Wireless Earphones 2 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. कंपनीने या इअरफोनच्या किंमतीत 500 रुपयांची कपात केली आहे.  किंमतीत कपात झाल्याने हे ‘ट्रू वायरलेस इअरफोन’ आता 4,499 रुपयांऐवजी 3,999 रुपयांमध्ये खरेदी करता येतील.

शाओमीचे Mi ट्रू वायरलेस इअरफोन-2 या वर्षीच मे महिन्यात भारतात लाँच झाले होते. तर, दोन दिवसांपूर्वीच वनप्सने आपले OnePlus Buds लाँच केले आहेत. वनप्लस बड्सची किंमत 4,990 रुपये असून ऑगस्टमध्ये विक्रीला सुरूवात होईल. त्यामुळे वनप्लसला टक्कर देण्यासाठी शाओमीने आपल्या ट्रू वायरलेस इअरफोनच्या किंमतीत कपात केल्याची चर्चा आहे.

Mi ट्रू वायरलेस इअरफोन-2 मध्ये  आउटर-इअर फिटिंगसह एअरपॉड्सप्रमाणे डिझाइन आहे. दमदार साउंडसाठी यामध्ये 14.2mm चे डाइनॅमिक ड्राइव्हर्स आहेत. तर, फास्ट चार्जिंग सपोर्टशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.0 सपोर्ट आहे. तसेच, अँड्रॉइड स्मार्टफोनसह विंडोज आणि iOS सिस्टिमलाही हे ट्रू-वायरलेस इअरफोन्स सपोर्ट करतात. याशिवाय अन्य अनेक फीचर्सही यामध्ये आहेत.