18 February 2019

News Flash

अल्ट्रासाऊंड, रक्तचाचणी यकृताच्या कर्करोग निदानासाठी उपयोगी

यकृताच्या कर्करोगाचे लवकर निदान करणे सोपे झाले आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अल्ट्रा ध्वनिलहरी आणि रक्तचाचणीद्वारे यकृताच्या कर्करोगाचे लवकर निदान करणे सोपे झाले आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील यकृताच्या कर्करोगाचे निदान अशा पद्धतीने ४० टक्क्यांनी होणार आहे. या निदान पद्धतीचा शोध भारतीय वंशाच्या संशोधकासह अमेरिकी संशोधकांनी लावला आहे.

यकृताच्या किंवा अन्य कोणत्याही कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास तो रुग्ण बचावण्याची किंवा बरा होण्याची शक्यता वाढते. यामुळे या रुग्णावर उपचार करण्यास डॉक्टरांना पुरेसा वेळ मिळतो व रुग्णही आणखी काही वर्षे जीवन जगू शकतो, असे भारतीय वंशाचे संशोधक जी. अमित सिंगल यांनी सांगितले. सिंगल हे टेक्सास विद्यापीठाच्या वैद्यकीय केंद्रामध्ये प्राध्यापक पदावर आहेत.

यकृताच्या कर्करोगाला हिपॅटोसेल्युलर कर्सिनोमा किंवा एचसीसी असे म्हणतात. या रोगामध्ये हिपॅटायटिस सीची लागण, तीव्र अल्कोहोलचा उपयोग आणि अल्कोहोलशिवाय यकृताच्या चरबीचे विकार अशा प्रकारच्या मधुमेह आणि लठ्ठपणाशी संबंधित आजारांचा समावेश होते.

यकृताच्या कर्करोगाची लक्षणे साधारणत: उदराच्या वरच्या भागात दुखणे किंवा सूज येणे, वजन घटणे किंवा खूप भूक लागणे व खूप थकवा जाणवणे ही आहेत. यापूर्वी यकृताच्या कर्करोगाचे निदान केवळ ओटीपोटातील अल्ट्रा ध्वनिलहरींद्वारे करण्यात येत होते. वर्षांनुवर्षे हीच पद्धत वापरण्यात येत होती. यामुळे अचूक निदान न होता, काही वेळा छोटय़ा गाठी असल्यास कर्करोग असल्याचे उशिराने समजत होते, असे सिंगल यांनी सांगितले.

टेक्सास विद्यापीठाच्या संशोधनात रक्तातील अल्फा फिटोप्रोटीन हे एचसीसीचे निदान करण्यास ४५ टक्के जास्त मदतगार असल्याचे आढळले. तर अल्ट्रा ध्वनिलहरींच्या एकत्रित वापराने हीच शक्यता ६३ टक्क्यांवर पोहोचत असल्याचे सिंगल म्हणाले. एएफपीचे प्रमाण साधारणत: कमी असते, मात्र यकृताच्या कर्करोगामध्ये एएफपीचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on February 12, 2018 12:54 am

Web Title: ultrasound and blood test good for health