भारतीय स्मार्टफोन ब्रॅंड इंटेक्सने आपला नवा स्मार्टफोन ‘स्टारी १०’ लॉन्च केला आहे. हा पहिला अनब्रेकेबल स्मार्टफोन असल्याचा कंपनीने दावा केला आहे. ५ हजार ९९९ रुपये किंमत असलेला हा स्मार्टफोन केवळ इ-कॉमर्स वेबसाइट स्नॅपडीलवर उपलब्ध असेल. हा फोन ब्लॅक, ब्ल्यू आणि शॅम्पेन या तीन कलर व्हॅरिअंटमध्ये उपलब्ध असेल.

विशेष म्हणजे फोनच्या डिस्प्लेसाठी कंपनीकडून एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देण्यात आली आहे. जिओच्या ग्राहकांना जिओ फुटबॉल ऑफर अंतर्गत २ हजार २०० रुपये कॅशबकची ऑफर आहे. तसंच युजर्सना अॅक्सिस बॅंक, एचएसबीसी आणि एचडीएफसीच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने हा फोन खरेदी केल्यास सह विविध ऑफर मिळतील. फोनमध्ये ३ जीबी रॅम देण्यात आला असून ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज मेमरी आहे. मात्र, एसडी कार्डच्या सहाय्याने १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. फोनमध्ये पॅनिक बटन आणि फोन ट्रॅकर यांसारखे इतर अनेक फीचर्स आहेत.

स्पेसिफिकेशन्स –
प्रोसेसर – १.३ गीगाहर्ट्झ क्वाड-कोर
ओपरेटिंग सिस्टीम – अॅन्ड्रॉइड १० नुगा ७.०
डिस्प्ले – ५.२ इंच आयपीएस डिस्प्ले (७२० X १२८० )
कॅमेरा – १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा ( एलईडी फ्लॅश)
बॅटरी – २८०० एमएएच
कनेक्टिव्हिटी – 4G Volte , 3G , 2G , WiFi 802.11, bluetooth, GPS, Micro-USB port