News Flash

WhatsApp वर सर्च करणं होणार आणखी सोपं

व्हॉटसअ‍ॅप सतत आपल्या युजर्सला नवीन फिचर्स देत असते.

WhatsApp वर सर्च करणं होणार आणखी सोपं

व्हॉटसअॅप हे सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत झाले आहे. या अॅपमुळे एकमेकांशी जोडलेले राहणे सहज शक्य झाले आहे. व्हॉटसअ‍ॅपही सतत आपल्या युजर्सला नवीन फिचर्स देत असते. आता लवकरच व्हॉटसअ‍ॅपवर अ‍ॅडव्हान्स सर्च करण्याची सुविधा मिळणार आहे. अॅडव्हान्स सर्चच्या माध्यमातून युजर्सला विविध वर्गवारीनुसार शोध घेता येणार आहे. व्हाटसअ‍ॅपबद्दल माहिती देणाऱ्या WABetaInfo या संकेतस्थळाने याबाबबत माहिती दिली आहे.

सध्या व्हॉटसअ‍ॅपवर कुणीही युजर अथवा ग्रुप यांना सर्च बारमधून शोधू शकतो. मात्र व्हाटसअ‍ॅप आता या सर्चची व्याप्ती वाढवणार आहे. याच्या अंतर्गत युजरला विविध वर्गवारींच्या माध्यमातून शोध घेता येणार आहे. यात युजर आणि ग्रुपसोबत विविध मिडीया फाईल्स शोधता येतील. यात प्रतिमा, व्हिडीओ, जीआयएफ, ऑडिओ, डॉक्युमेंट, लिंक्स आदींचा समावेश असणार आहे. सध्या हे फिचर आयओएस प्रणालीच्या बीटा (प्रयोगात्मक) युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. लवकरच अँड्रॉइड युजर्ससाठीही उपलबद्ध होणार आहे.

अ‍ॅडव्हान्स सर्चमध्ये युजर्स हव्या त्या फाईल्स शोधू शकतो. यासाठी युजरला संबंधीत आयकॉनवर क्लिक करावे लागणार आहे. याशिवाय, यात सर्च हिस्ट्रीदेखील दिसणार आहे. अर्थात ही हिस्ट्री क्लिअर करण्याची सुविधासुध्दा यात देण्यात येणार आहे.

डार्क मोड –

डार्क मोडमुळे युजर्सच्या डोळ्याला मोबाईल स्क्रीनमुळे होणारा त्रास कमी होणार आहे. सध्या हा मोड इतर सोशल मीडिया, मोबाईल आणि वेबसाईटस यांमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र आता तो व्हॉटसअॅपवर येणार असल्याने युजर्ससाठी ते अतिशय फायद्याचे ठरणार आहे. रात्रीच्या वेळी मोबाईलवर पाहताना डोळ्याला त्रास होऊ नये यासाठी प्रामुख्याने या मोडचा उपयोग करण्यात येतो. याबाबतच्या चाचण्या सुरु असून लवकरच तो प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे.

नकोशा WhatsApp ग्रुपपासून होणार सुटका –
WhatsApp युजर्सना दिलासा देणारं वृत्त आहे. व्हॉटस अ‍ॅप ग्रुपमध्ये कोणालाही अ‍ॅड करायचे असल्यास त्या व्यक्तीची परवानगी असणे आता गरजेचे होणार आहे, जर तुमची परवानगी नसेल तर कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. व्हॉट्सने त्याबाबातची पडताळणी सुरू केली आहे. सध्या 2.19.55 व्हर्जनवर हे नवे अपडेट आले आहे. या नव्या अपडेटद्वारे एखाद्याला ग्रुपमध्ये अॅड करायचे असल्यास त्या युजर्सची परवानगी घ्यावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 12:16 pm

Web Title: upcoming whatsapp features advanced search dark mode and more
Next Stories
1 उन्हाळ्यात त्वचेच्या देखभालीसाठीच्या खास टिप्स
2 प्रेम करा खाण्यावर, खाण्याच्या पद्धतीवर!
3 डेटवर जाताय? अशी करा कपड्याची निवड
Just Now!
X